जायरा वसीम छेडछाड प्रकरणावर करिना कपूर बोलली, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 10:43 AM2017-12-17T10:43:42+5:302017-12-17T16:13:42+5:30

अभिनेत्री करिना कपूर-खानने अल्पवयीन अभिनेत्री जायरा वसीम हिच्याशी झालेल्या छेडछाड प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. करिनाने म्हटले की, महिला ...

Kareena Kapoor talks about Zaheera Waseem Stampede, read detailed! | जायरा वसीम छेडछाड प्रकरणावर करिना कपूर बोलली, वाचा सविस्तर!

जायरा वसीम छेडछाड प्रकरणावर करिना कपूर बोलली, वाचा सविस्तर!

googlenewsNext
िनेत्री करिना कपूर-खानने अल्पवयीन अभिनेत्री जायरा वसीम हिच्याशी झालेल्या छेडछाड प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. करिनाने म्हटले की, महिला त्यांच्या जीवनात प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम आहेत. करिना मुंबई येथे आयोजित केलेल्या लक्स गोल्डन रोज अवॉर्ड्स कार्यक्रमात बोलत होती. रेड कार्पेटवर आपला जलवा दाखविणाºया करिनाने महिला सशक्तिकरणावरही आपली परखड भूमिका मांडली. तसेच जायरासोबत झालेल्या या प्रकरणावरही तिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 

करिनाला जेव्हा जायरासोबत झालेल्या छेडछाड प्रकरणी विचारण्यात आले तेव्हा करिनाने म्हटले, ‘मला असे वाटते की, महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक श्रेष्ठ आहेत. आम्ही फायटर आहोत. आमच्या जीवनात जी काही स्थिती असते, मग ती व्यक्तिगत असो वा व्यावसायिक जीवनात असो त्याचा आम्ही धाडसाने सामना करीत असतो.’ पुढे बोलताना करिनाने म्हटले की, ‘आपण देवी लक्ष्मीची अर्चना करतो. त्यादेखील महिला आहेत. आपण त्यांना सर्वश्रेष्ठ दर्जा देतो मग महिलांबाबत अशी मानसिकता का ठेवली जाते? समाजातील प्रत्येक घटकाने महिलांचा आदर करायला हवा.’



दरम्यान, या कार्यक्रमात आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, कॅटरिना कैफ, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, जूही चावला, फातिमा सना, भूमी पेडणेकर, सुशांतसिंग राजपूत या  कलाकारांसह जायरा वसीमही उपस्थित होती. दरम्यान, विस्तारा एअरलाइन्समध्ये दिल्ली ते मुंबई प्रवास करताना जायरा वसीमसोबत छेडछाड झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करीत त्याच्या पोस्को अंतर्गत गुन्हाही दाखल केला. सध्या संशयिताला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. परंतु या प्रकरणावर ज्या पद्धतीने खुलासे समोर येत आहेत, त्यावरून जायराचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याची टीकाही तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. 

Web Title: Kareena Kapoor talks about Zaheera Waseem Stampede, read detailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.