Viral Video: करिना कपूरच्या कारखाली अडकला फोटोग्राफरचा पाय; रागात ओरडली बेबो...!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 10:28 AM2022-04-05T10:28:48+5:302022-04-05T10:30:12+5:30

Kareena Kapoor Video: करिना कपूरचा अ‍ॅटिट्यूड भलताच भारी. या अ‍ॅटिट्यूडमुळे आणि स्टाईल स्टेटमेंटमुळे ती सतत चर्चेत असते. सध्या मात्र तिच्या एका व्हिडीओची चर्चा आहे

kareena kapoor shouts at her driver paparazzi hurt malaika arora | Viral Video: करिना कपूरच्या कारखाली अडकला फोटोग्राफरचा पाय; रागात ओरडली बेबो...!

Viral Video: करिना कपूरच्या कारखाली अडकला फोटोग्राफरचा पाय; रागात ओरडली बेबो...!

googlenewsNext

करिना कपूरचा  (Kareena Kapoor Khan) अ‍ॅटिट्यूड भलताच भारी. या अ‍ॅटिट्यूडमुळे आणि स्टाईल स्टेटमेंटमुळे ती सतत चर्चेत असते. सध्या मात्र तिच्या एका व्हिडीओची चर्चा आहे. होय, एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यात करिना तिच्या ड्रायव्हरवर ओरडताना दिसतेय.
बेबो नुकतीच तिची मैत्रीण मलायका अरोराला भेटायला तिच्या घरी गेली होती. तिला भेटून बाहेर पडताना बेबोसोबत असं काही घडलं की, त्याची जोरदार चर्चा झाली. या घटनेचा व्हिडीओही क्षणात व्हायरल झाला.
 सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर बेबोचा   हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

तर झालं असं की, करिना मलायकाला भेटून बाहेर निघाली. ती बाहेर येताच पापाराझींनी तिच्या भोवती एकच गर्दी केली. बेबोची एक झलक कॅमेºयात कैद करण्यासाठी फोटोग्राफर्सची झुंबड उडाली. याचदरम्यान एका फोटोग्राफरचा पाय करिनाच्या कारखाली चिरडला गेला.

व्हिडीओत करीना कपूर मलायका अरोराच्या अपार्टमेंटमधून बाहेर निघताना दिसत आहे. इतक्यात अचानक एक फोटोग्राफर ‘मेरा पैर... मेरा पैर’ असं ओरडत असल्याचं तिला ऐकू येतं.  एका फोटोग्राफरचा पाय कारखाली अडकल्यानं तो ओरडत असल्याचं  पाहून करीना एकदम अ‍ॅक्शनमध्ये येते आणि जोरात आपल्या ड्रायव्हरला, ‘पिछे जा यार...,’असं  चिडून ओरडताना दिसते. यानंतर ती जखमी फोटोग्राफरकडे वळते. ‘संभालो, तुम लोग भागा मत करो यार... क्यों भाग रहे हो?,’ असं म्हणते आणि यानंतर गाडीत बसून निघून जाते.

2 एप्रिलला मलायकाचा कार अपघात झाला होता. तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी तिची तिच्या घरी जात भेट घेतली. बेबोनेही मलायकाची भेट घेत, तिच्या तब्येतीची विचारपूस केली. 

Web Title: kareena kapoor shouts at her driver paparazzi hurt malaika arora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.