करीना कपूरने शेअर केला ब्लॅक अँड व्हाईट फोटो, म्हणाली,'..याची वाट पाहतेय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 18:01 IST2021-01-07T17:54:58+5:302021-01-07T18:01:57+5:30

आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात करिना दिसणार आहे.

Kareena kapoor shares her black and white photo said that i am waiting | करीना कपूरने शेअर केला ब्लॅक अँड व्हाईट फोटो, म्हणाली,'..याची वाट पाहतेय'

करीना कपूरने शेअर केला ब्लॅक अँड व्हाईट फोटो, म्हणाली,'..याची वाट पाहतेय'

अभिनेत्री करिना कपूर कपूर सध्या तिची प्रेग्नेंन्सी एन्जॉय करते आहे. तिचा एक स्टनिंग आणि नवीन फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने ग्लॅमरस  ड्रेस परिधान केला आहे. असे दिसते आहे की करिना कोणाची तरी वाट पहात आहे.

फोटोमध्ये करिनाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, हिलचे सँडल्स घालून सोफ्यावर बसून पोज देत आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, "मी प्रतीक्षा करते आहे." करिनाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.. मलाइका अरोरा करिनाच्या फोटोवर कमेंट करताना लिहिले की, "मी देखील प्रतीक्षा करत आहे." 

आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात करिना दिसणार आहे. 2021 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. याशिवाय करण जोहरच्या ‘तख्त’ या सिनेमातही ती झळकणार आहे. अलीकडे एका मुलाखतीत बेबो तिच्या दुस-या प्रेग्नंसीवर बोलताना दिसली होती. अशी कोणती गोष्ट आहे, जी दुस-या प्रेग्नंसीत तुला करायची नाही, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर मला खूप जास्त वजन वाढवायचे नाही, असे ती म्हणाली होती. तैमूरच्यावेळी प्रेग्नंट असताना मला सर्वांनी खूप खाण्याचा सल्ला दिला होता आणि मी नुसते खात सुटले होते. यामुळे माझे वजन 25 किलो वाढले होते. आता मला पुन्हा असे करायचे नाही.

Web Title: Kareena kapoor shares her black and white photo said that i am waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.