आधी ‘त्या’ जाहिराती बंद कर...! बेबोने केली पोस्ट, नेटक-यांनी घेतला क्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 01:32 PM2020-06-03T13:32:13+5:302020-06-03T13:32:46+5:30

करिनाने अमेरिकेतील आंदोलनाला पाठींबा देणारी पोस्ट केली. पण या पोस्टमुळे बेबो प्रचंड ट्रोल झाली.

kareena kapoor post for george floyd death gets trolled for their ads | आधी ‘त्या’ जाहिराती बंद कर...! बेबोने केली पोस्ट, नेटक-यांनी घेतला क्लास

आधी ‘त्या’ जाहिराती बंद कर...! बेबोने केली पोस्ट, नेटक-यांनी घेतला क्लास

googlenewsNext
ठळक मुद्देकरिनाच नाही तर दिशा पाटनी हिलाही याच कारणासाठी लोकांनी ट्रोल केले. 

 जॉर्ज फ्लॉयडच्या या कृष्णवर्णीय व्यक्तिच्या मृत्यूनंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाची लाट उसळली आहे. २५ मे रोजी अमेरिकेतील मिनेसोटा राज्यात एका श्वेत पोलीस अधिका-याने फ्लॉयडचे हात बांधून पायाने त्याचा गळा दाबला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अमेरिकेत हिंसक प्रदर्शने सुरू आहेत. फ्लॉयडच्या मृत्यूचा संबंध अमेरिकेतील वर्णद्वेषाशी जोडला जात आहे. कृष्णवर्णीयांवर होत असलेल्या हल्ल्याच्या, वर्णद्वेषाच्या विरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. जगभर या प्रकरणावर संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यावर व्यक्त होत प्रतिक्रिया दिल्या आहेत. करिना कपूर ही त्यापैकीच एक. करिनाने अमेरिकेतील आंदोलनाला पाठींबा देणारी पोस्ट केली. पण या पोस्टमुळे बेबो प्रचंड ट्रोल झाली.

करिनानेही जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूवर पोस्ट केली आणि काहीच वेळात नेटक-यांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.

‘प्रत्येक रंग हा सुंदरच असतो. आपण वेगवेगळा रंग घेऊन जन्माला आलो असलो तरी आपण सर्व समान आहोत. समाजातील प्रत्येकाला स्वात्र्यंत, समानता आणि आदर मिळायलाच हवा. हा वर्णद्वेष लवकरच संपेल, असा मला विश्वास आहे. सुरक्षित राहा, खंबीर राहा,’असे  करिनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.


मात्र तिची पोस्ट अनेकांना भावली नाही़. सगळे रंग समान आहेत तर रंग गोरा करणा-या जाहिराती का करतेस? असा खरपूस सवाल एका युजरने तिला विचारला.
 खरंच सर्व रंगांना समान मानतेस की फक्त चर्चेत राहण्यासाठी अशा पोस्ट करतेय? असेही काही जणांनी तिला सुनावले. वर्णद्वेष अमेरिकेतच नाही तर भारतातही स्थिती गंभीर आहे. कारण तुझ्यासारखे अनेक सेलिब्रिटी गोरा रंग मिळवण्यासाठीच्या उत्पादनांच्या जाहिरातील करतात. हे वर्णद्वेषाचेच उदाहरण आहे. तुला इतकी काळजी असेल तर आधी या जाहिराती करणे बंद कर, अशा शब्दांत नेटक-यांनी तिचा क्लास घेतला.
करिनाच नाही तर दिशा पाटनी हिलाही याच कारणासाठी लोकांनी ट्रोल केले. 

Web Title: kareena kapoor post for george floyd death gets trolled for their ads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.