सैफ अली खान खूश्श! दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर बेबोला देणार 2.5 कोटींचे खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 12:33 IST2021-03-10T12:33:18+5:302021-03-10T12:33:53+5:30

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री करिना कपूरने दुसऱ्या पुत्ररत्नाला जन्म दिला. पुत्ररत्नाच्या जन्माने करिना व सैफ अली खान जाम खूश आहेत. अशात सैफ बेबोला एक खास गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे.

kareena kapoor makes first public appearance with saif ali khan for test drive | सैफ अली खान खूश्श! दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर बेबोला देणार 2.5 कोटींचे खास गिफ्ट

सैफ अली खान खूश्श! दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर बेबोला देणार 2.5 कोटींचे खास गिफ्ट

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वीच या सैफिनाने मुंबईमध्ये नवीन घर विकत घेतले. दुस-या बाळाच्या जन्माआधीच बेबो सैफसोबत या नवीन घरात शिफ्ट झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री करिना कपूरने दुसऱ्या पुत्ररत्नाला जन्म दिला. पुत्ररत्नाच्या जन्माने करिना व सैफ अली खान जाम खूश आहेत. अशात सैफ बेबोला एक खास गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. होय, छोट्या नवाबाच्या जन्मानंतर सैफ बेबोला एक महागडी भेट देणार आहे. हे गिफ्ट काय तर 2.5 कोटींची एसयूव्ही.

दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर मंगळवारी पहिल्यांदा सैफ आणि करिना मुंबईत सोबत दिसले. हे दोघंही एका कारच्या टेस्ट ड्राइव्हसाठी  घरातून बाहेर पडले होते. ही कार सैफ करिनाला गिफ्ट देणार असल्याचे म्हटले जातेय.

सैफिनाने मंगळवारी Mercedes-Benz G-Class या कारची ची टेस्ट ड्राइव्ह घेतली. यादरम्यान सैफ गाडी चालवताना दिसला तर करिना बाजूच्या सीटवर बसली होती. यावेळचा दोघांचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुस-या मुलाच्या जन्मानंतर सैफ करिनासाठी ही गाडी विकत घेणार आहे. Mercedes-Benz G-Class या कारची किंमत तब्बल 2.5 कोटी इतकी आहे.


 
काही दिवसांपूर्वीच या सैफिनाने मुंबईमध्ये नवीन घर विकत घेतले. दुस-या बाळाच्या जन्माआधीच बेबो सैफसोबत या नवीन घरात शिफ्ट झाली आहे. अद्याप करिनाच्या दुसऱ्या मुलाचा चेहरा चाहत्यांना दिसलेला नाही. महिला दिनी बेबोने  मुलासोबतचा एक फोटोही पोस्ट केला होता. मात्र, यात मुलाचा चेहरा दिसत नव्हता. अद्याप सैफिनाने आपल्या बाळाच्या नावाबद्दलही माहिती दिलेली नाही.

Web Title: kareena kapoor makes first public appearance with saif ali khan for test drive