तैमूर, करिना कपूर, सैफ अली खानचा मरीन ड्राईव्हवर सैरसपाटा, पण मास्क कुठायं? लोकांनी केले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 10:58 IST2020-06-08T10:56:25+5:302020-06-08T10:58:21+5:30

व्हिडीओत करिना आणि तैमूरच्या तोंडावर मास्क आहे. पण सैफ अली खानच्या तोंडावर मास्क नाही. 

Kareena Kapoor Khan, Taimur Walk Near Marine Drive Fans Ask Where Is Saif ali khan's Mask? | तैमूर, करिना कपूर, सैफ अली खानचा मरीन ड्राईव्हवर सैरसपाटा, पण मास्क कुठायं? लोकांनी केले ट्रोल

तैमूर, करिना कपूर, सैफ अली खानचा मरीन ड्राईव्हवर सैरसपाटा, पण मास्क कुठायं? लोकांनी केले ट्रोल

ठळक मुद्देसैफ अली सारख्या जबाबदार अभिनेत्याने मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरणे दु:खद आहे. यामुळे लोकांमध्ये चुकीचे उदाहरण जाते, असे एका युजरने म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खानचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. करिना कपूर, सैफ अली खान आणि सोबत त्यांचा लाडका तैमूर मरीन ड्राईव्हच्या बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. तूर्तास या व्हिडीओमुळे सैफ अली चांगलाच ट्रोल होताना दिसतोय. 
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे. सरकारने याला ‘अनलॉक 1’ असे नाव दिले आहे. कारण या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये ब-याच बाबतीत शिथीलता देण्यात आली आहे. अर्थात तरीही जनतेला काही गाइडलाइन्स फॉलो करणे बंधनकारक आहे. याअंतर्गत बाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. व्हिडीओत करिना आणि तैमूरच्या तोंडावर मास्क आहे. पण सैफ अली खानच्या तोंडावर मास्क नाही. याचमुळे सध्या तो ट्रोल होतोय.

अनेक युजर्सनी यावरून सैफला सुनावले आहे. देशात कोरोनाचा धोका वाढत असताना सैफ अली सारख्या जबाबदार अभिनेत्याने मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरणे दु:खद आहे. यामुळे लोकांमध्ये चुकीचे उदाहरण जाते, असे एका युजरने म्हटले आहे. 

अन्य एका युजरने तर यावरून सैफला चांगलेच फैलावर घेतले आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा सर्वाधिक असताना सेलिब्रिटींसाठी मास्कऐवजी सन ग्लासेस घालणे अधिक महत्त्वाचे आहे. यालाच ‘डेडली स्वॅग’ म्हणतात, असे एका युजरने म्हटले आहे. अन्य एका युजरने तर हे सगळे भयंकर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
अद्याप सैफ यावर काहीही बोलला नाही़ तो काय बोलतो ते बघूच.

Web Title: Kareena Kapoor Khan, Taimur Walk Near Marine Drive Fans Ask Where Is Saif ali khan's Mask?