करिना कपूर खानने सुरु केली वीरे दी वेडिंगची शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 05:00 AM2017-08-22T05:00:02+5:302017-08-22T10:44:13+5:30

करिना कपूर, सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांचा आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग' गेल्या अनेक महिन्यांपासून काहींना काही कारणामुळे ...

Kareena Kapoor Khan started the shooting of Veerre The Wedding | करिना कपूर खानने सुरु केली वीरे दी वेडिंगची शूटिंग

करिना कपूर खानने सुरु केली वीरे दी वेडिंगची शूटिंग

googlenewsNext
िना कपूर, सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांचा आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग' गेल्या अनेक महिन्यांपासून काहींना काही कारणामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा चित्रपट रखडला होता. त्यामुळे मध्यंतरी हा चित्रपट बंद झाल्याचीदेखील चर्चा होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. या चित्रपटात करिना कपूर, स्वरा भास्कर आणि सोनम कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती सोनम कपूरची बहिण रिया कपूर करतेय. चित्रपटाची शूटिंग सप्टेंबरमध्ये सुरु करण्यात येणार आहे. आता चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनचे काम सुरु करण्यात आले आहे. सध्या चित्रपटाची स्टारकास्ट स्क्रिप्ट वाचण्याचे काम करतेय. स्क्रिप्ट वाचण्यासाठी एकत्र आला असतानाचा यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 


या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधी करिना कपूर जीममध्ये जाऊन वर्कआऊट करताना दिसली. प्रेग्नेंसी दरम्यान वाढलेले वजन करिना कपूरने चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यापूर्वी कमी केले आहे. करिना चित्रपटाच्या शूटिंग सुरु करण्यापूर्वी नुकतीच सैफ अली खान आणि तैमुरसोबत स्वित्झर्लंडला जाऊन व्हेकेशन एन्जॉय करुन आली आहे. वीरे दी वेडिंग चित्रपटाची कथा चार मुलींच्या भवती फिरणारी आहे. शशांक घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. करिनाने चित्रपटासाठी नुकतीच स्क्रिन टेस्टसुद्धा दिली आहे तसेच ती लवकरच वर्कशॉपसुद्धा अटेंड करणार आहे. या चित्रपटाचा बराचसा भाग दिल्लीत शूट करण्यात येणार आहे. चित्रपटाची टीम दिल्लीतील काही भागांची यासाठी रेकीसुद्धा करते आहे. 

Web Title: Kareena Kapoor Khan started the shooting of Veerre The Wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.