करिना कपूरचा ‘तो’ प्रश्न ऐकून सारा अली खानला बसला धक्का, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 12:27 IST2020-02-07T12:26:26+5:302020-02-07T12:27:17+5:30

साराने नुकतीच करिनाच्या ‘व्हॉट विमेन वॉन्ट’ चॅट शोमध्ये हजेरी लावाली.

kareena kapoor khan sara ali khan discussed modern relationships and revealed had a one night stand |  करिना कपूरचा ‘तो’ प्रश्न ऐकून सारा अली खानला बसला धक्का, पाहा व्हिडीओ

 करिना कपूरचा ‘तो’ प्रश्न ऐकून सारा अली खानला बसला धक्का, पाहा व्हिडीओ

ठळक मुद्देकार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘लव्ह आजकल’ हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या परखड स्वभावासाठी ओळखली जाते. कुठलीही लपवाछपवी न करता ती बिनधास्त बोलते. अलीकडे सारा तिची सावत्र आई करिना कपूरच्या ‘व्हॉट विमेन वॉन्ट’ या रेडिओ टॉक शोमध्ये पोहोचली. याठिकाणी साराला अशा काही प्रश्नाचा सामना करावा लागला, ज्यावर बोलताना आपल्यापैकी अनेकजण शंभरदा विचार करतील. होय, करिनाने साराला प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफबद्दलही प्रश्न विचारले.
तू कधी कोणाला नॉटी टेक्स्ट मॅसेज पाठवले आहेत का? असा प्रश्न करिनाने साराला केला. पण हा प्रश्न विचारताना करिना स्वत:च घाबरलेली दिसली.  आशा करते तुझ्या बाबांनी(सैफ अली खान)हे सर्व ऐकू नये. अर्थात  मी हे सर्व घरी जाऊन त्याला सांगू शकते, असे करिना म्हणते. मात्र यावर सारा तिला असे न करण्याचे सुचवते.


कधी खोडकर मॅसेज केलेत? यावर सारा काहीसे लाजत ‘हो’ असे उत्तर देते. रिलेशनशिपमध्ये होणा-या गोष्टींबद्दलही करिना  साराला अनेक प्रश्न करते. यावर बोलताना, मी असे काहीही केलेले नाही, ज्याचे मी उत्तर देऊ शकणार नाही. मी कुणालाही कुठल्याही नात्यात धोका दिलेला नाही. कधीही माझ्या पार्टनरचा फोन चेक केलेला नाही, असे सारा म्हणते.

यानंतर करिना साराला असा काही प्रश्न विचारते की, काही क्षण साराही भांबावते. केवळ साराच नाही तर प्रश्न विचारताना करिनाही मनातून काहीशी घाबरलेली दिसते. मी हा प्रश्न विचारायला हवा की नको, माहित नाही. पण ठीक आहे आपण एक मॉडर्न फॅमिली आहोत. तर तू कधी ‘वन नाईट स्टँड’ केलेस? असे करिनाने विचारते. तिच्या या प्रश्नाने साराला धक्काच बसतो. पण नंतर स्वत:ला सावरत  ‘नाही, असे काहीही झालेले नाही’, असे उत्तर सारा देते. साराच्या या उत्तरानंतर करिना जरा रिलॅक्स होते. छान, असे ती म्हणते.

Web Title: kareena kapoor khan sara ali khan discussed modern relationships and revealed had a one night stand