ही कशी आई? अनुष्का शर्मा, श्लोक अंबानीकडून जरा शिक ...! नेटकऱ्यांनी घेतली करिना कपूरची शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 12:19 IST2021-03-16T12:18:17+5:302021-03-16T12:19:11+5:30

अमृता अरोराच्या सोसायटीच्या खाली कारमधून उतरत असतानाचा करिनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांनी बेबोला ट्रोल करणे सुरु केले.

Kareena Kapoor Khan gets trolled for leaving her newborn baby and visiting Amrita Arora's house | ही कशी आई? अनुष्का शर्मा, श्लोक अंबानीकडून जरा शिक ...! नेटकऱ्यांनी घेतली करिना कपूरची शाळा

ही कशी आई? अनुष्का शर्मा, श्लोक अंबानीकडून जरा शिक ...! नेटकऱ्यांनी घेतली करिना कपूरची शाळा

ठळक मुद्देप्रसूतीनंतर करिना सतत ट्रोल होतेय. काही दिवसांपूर्वीच करिना बहिणीच्या घरी दिसली होती. यादरम्यानचा तिचा व्हिडीओ पाहूनही लोकांनी तिला असेच ट्रोल केले होते.

गेल्या 21 फेब्रुवारीला करिना कपूरने दुस-या मुलाला जन्म दिला. अद्याप करिनाचे दुसरे बाळ महिन्याचेही झालेले नाही. पण गेल्या काही दिवसांत बेबो अनेकदा बाहेर फिरताना दिसली. आधी सैफ अली खानसोबत नव्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला ती बाहेर पडली. मग करिश्माच्या मुलीच्या बर्थ डे पार्टीला पोहोचली आणि यानंतर काय तर अमृता अरोराला भेटायला तिच्या घरी गेली. अमृताच्या सोसायटीच्या खाली कारमधून उतरत असतानाचा करिनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांनी बेबोला ट्रोल करणे सुरु केले.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने करिनाचा हा व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहताच सोशल मीडिया युजर्सनी करिनाला ट्रोल करणे सुरु केले. बाळ कुठेय? महिनाभराच्या बाळाला घरी एकटं सोडून ही बया फिरतेय, अशा काय काय कमेंट्स युजर्सनी दिल्यात.

‘खरोखर घोर कलयुग आहे. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला सोडून ही फिरत आहे,’ असे एका युजरने तिच्या या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिले.   आपल्या 20 दिवसांच्या बाळाला सोडून  मैत्रिणींना भेटायला जाणारी, ही कशी आई आहे? अशा शब्दांत एका युजरने करिनाला ट्रोल केले.

काहींनी तर करिनाला थेट अनुष्का शर्मा आणि श्लोका अंबानीकडून काहीतरी शिक, असा सल्ला दिला. ‘श्लोका अंबानी आणि अनुष्का शर्माकडून काहीतरी शिक.  गरोदरपणाचा आणि प्रसूतीनंतर काळ किती महत्त्वाचा असतो, हे त्या तुला सांगतील,’ असे या युजरने लिहिले.
प्रसूतीनंतर करिना सतत ट्रोल होतेय. काही दिवसांपूर्वीच करिना बहिणीच्या घरी दिसली होती. यादरम्यानचा तिचा व्हिडीओ पाहूनही लोकांनी तिला असेच ट्रोल केले होते. या व्हिडीओत तैमूर तिच्यासोबत होता आणि कारमधून उतरल्यावर तैमूर काचेच्या दरवाज्यावर आदळला होता. त्यावरूनही लोकांनी करिनाला ट्रोल केले होते. आई असून तैमूरकडे लक्ष दिल्याने करिनाला लोकांनी नको ते सुनावले होते.

Web Title: Kareena Kapoor Khan gets trolled for leaving her newborn baby and visiting Amrita Arora's house