करिना कपूर खानच्या प्रेग्नेंसीला झाले 5 महिने, विना मेकअप लूकमधला सेल्फी शेअर करत सांगितला अनुभव
By गीतांजली | Updated: October 3, 2020 18:45 IST2020-10-03T18:45:00+5:302020-10-03T18:45:01+5:30
करीना कपूर इन्स्टाग्रामवर आल्यापासून आपल्या फोटो आणि व्हिडीओला घेऊन ती चर्चेत असते.

करिना कपूर खानच्या प्रेग्नेंसीला झाले 5 महिने, विना मेकअप लूकमधला सेल्फी शेअर करत सांगितला अनुभव
करीना कपूर इन्स्टाग्रामवर आल्यापासून आपल्या फोटो आणि व्हिडीओला घेऊन ती चर्चेत असते. सध्या करीना आपल्या फोटोंपेक्षा जास्त प्रेग्नेंसीला घेऊन चर्चेत आहे. करिना कपूर पाच महिन्यांची प्रेग्नेंट आहे. शनिवारी करीनाने आपला एक सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटो शेअर करताना करिनान े कॅप्शन दिले, 5 महिने आणि मजबूत होतेय.
या फोटोमध्ये करिना कपूर विना मेकअप दिसतेय. या फोटोत करिनाने ब्लॅक कलरचा चेक्सवाला कफ्तान परिधान केलेला आहे. तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो फोटोत दिसतोय. करीना सध्या लाल सिंग चड्ढाच्या शूटिंगसाठी सैफ अली खान आणि तैमूरसोबत दिल्लीला गेली आहे.
लाल सिंग चड्ढाच्या माध्यमातून करिना पुन्हा एकदा आमिर खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 'लाल सिंग चड्ढा’ आहे हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल.याशिवाय करिना कपूरने करण जोहरचा मल्टी-स्टारर 'तख्त'सुद्धा साईन केला आहे. या सिनेमात अनिल कपूर, रणवीर सिंग, विकी कौशल, आलिया भट आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Happy Birthday Kareena Kapoor: 'या' अटीवर सैफ अली खानसोबत लग्नाला तयार झाली होती बेबो