बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली करिना कपूर, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By गीतांजली | Updated: October 23, 2020 15:33 IST2020-10-23T15:16:42+5:302020-10-23T15:33:51+5:30

सोशल मीडियावर करिनाचे हे फोटो वेगाने व्हायरल होतायेत.

kareena kapoor khan flaunts baby bump photos viral on internet | बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली करिना कपूर, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली करिना कपूर, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

करिना कपूर खान गुरुवारी (काल) रात्री मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. करिनाने यावेळी वनपीस घातला होता त्यावर डेनिम जॅकेट घेतले होते. या ड्रेसमध्ये करिना कपूरचे बेबी बॅम्प स्पष्ट दिसत होते. करिना कपूरच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंन्सीचा ग्लो आला आहे. सोशल मीडियावर करिनाचे हे फोटो वेगाने व्हायरल होतायेत.  करिनासोबत यावेळी सैफ अली खानदेखील होता.

2021मध्ये सैफ आणि करिना दुसऱ्यांदा आई होणार आहे. अलीकडेच करिनान 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग पूर्ण करुन मुंबईत परतली आहे. जवळपास एक महिना सैफ, करिना आणि तैमूर दिल्लीतील पतौडी पॅलेसमध्ये थांबले होते. शूटिंग पूर्ण झाल्यावर करिनाने एका पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ''मी लाल सिंग चड्ढाचे शूटिंग पूर्ण केले. कठीण काळ होता मी प्रेग्नेंन्सी, भीती, मात्र यासगळ्या गोष्टी माझ्या ध्येयाला थांबवू शकल्या नाहीत. मी शूटिंग पूर्ण केले. सर्व काळजी घेत. आमिर खान आणि अव्दैत चंदन यांचे आभार. धन्यवाद टीम.'' असे या पोस्टमध्ये करिनाने लिहिले होते.  

करिना कपूर आपली  प्रेग्नेंन्सी एन्जॉय करताना दिसतेय. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. या फोटो आणि व्हिडीओमधून करिना प्रेग्नेंन्सीचा आनंद घेताना स्पष्ट दिसते. 

Web Title: kareena kapoor khan flaunts baby bump photos viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.