60 व्या वर्षी ‘अब्बा’...; सैफ अली खानबद्दल करिना कपूर हे काय बोलून गेली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 16:53 IST2022-03-31T16:50:26+5:302022-03-31T16:53:10+5:30

Kareena Kapoor, Saif Ali Khan : करिना अनेकदा आपल्या नवऱ्याचं म्हणजेच सैफचं कौतुक करताना दिसते. पण अलीकडे करिनाने सैफची चांगलीच फिरकी घेतली.

kareena kapoor has warned saif ali khan not to have another baby at 60 | 60 व्या वर्षी ‘अब्बा’...; सैफ अली खानबद्दल करिना कपूर हे काय बोलून गेली ?

60 व्या वर्षी ‘अब्बा’...; सैफ अली खानबद्दल करिना कपूर हे काय बोलून गेली ?

बेबो अर्थात करिना कपूर  (Kareena Kapoor) बॉलिवूडची एक बिनधास्त अभिनेत्री. आपल्या अटींवर जगणारी. बेबोनं सैफ अली खानशी (Saif Ali Khan) लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यांसाठीच हा  एक धक्का होता. कारण सैफ घटस्फोटित होता, दोन मुलांचा बाप होता. पण करिना तिच्या निर्णयावर ठाम राहिली आणि सैफची ‘बेगम’ बनली. आताश: करिना व सैफ यांना तैमूर व जेह अशी दोन मुलं आहेत. दोघांंचंही कुटुंब पूर्ण झालं आहे. 

करिना अनेकदा आपल्या नवऱ्याचं म्हणजेच सैफचं कौतुक करताना दिसते. सैफ ज्याप्रकारे आपल्या चारही मुलांची काळजी घेतो, ती गोष्ट करिनाला सर्वाधिक भावते. सैफची पहिली मुलगी (पहिली पत्नी अमृता सिंगपासून झालेली सारा अली खान) सारा ही 26 वर्षांची आहे तर दुसरीकडे सैफचा सर्वात लहान मुलगा जेह (दुसरी पत्नी करिनापासून झालेला) उण्यापुऱ्या सव्वा वर्षाचा आहे. सारा व जेह या सावत्र भावंडात 25 वर्षाचं अंतर आहे. अलीकडे करिना कपूर यावरच बोलली. एका मासिकाला मुलाखत देताना करिनाने सैफची चांगलीच फिरकी घेतली. पण सरतेशेवटी सैफचं तिने पुन्हा एकदा मनापासून कौतुक केलं. तो किती उत्तम पिता आहे, हे तिने सांगितलं.

काय म्हणाली करिना?
सैफला प्रत्येक दशकात एक मुलं झालं. 20 व्या वर्षी एक, 30 व्या वर्षी दुसरं, 40 व्या वर्षी तिसरं आणि 50 व्या वर्षी चौथं मुलं. पण साठीत असं काहीही शक्य नाही. 60 व्या वर्षी अब्बा बनण्याचा विचारही करू नकोस, हे मी आधीच त्याला बजावून ठेवलंय. सैफ सारखा ब्रॉड माइंडेड व्यक्तीचं वेगवेगळ्या टप्प्यावर चार मुलांचा पिता होऊन शकतो. तो चारही मुलांना आपला पूर्ण वेळ देतो. जेहला सुद्धा तो सांभाळतो. आमच्यात तसा एक करारही झाला आहे. जेव्हा तो शूटींगवर असेल तेव्हा मी घरी राहिल आणि माझं शूटींग असेल तेव्हा तो घरी मुलांना सांभाळेल, असं आम्ही ठरवलं आहे, असं करिना या मुलाखतीत म्हणाली.

Web Title: kareena kapoor has warned saif ali khan not to have another baby at 60