​कोणी अभिनेता नव्हे तर हा राजकारणी आवडायचा करिना कपूरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 11:35 IST2018-02-06T06:05:18+5:302018-02-06T11:35:18+5:30

करिना कपूर आणि सैफ अली खान यांचे आज लग्न झाले असून ते दोघे त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत. त्यांना तैमूर ...

Kareena Kapoor does not like an actor but a politician | ​कोणी अभिनेता नव्हे तर हा राजकारणी आवडायचा करिना कपूरला

​कोणी अभिनेता नव्हे तर हा राजकारणी आवडायचा करिना कपूरला

िना कपूर आणि सैफ अली खान यांचे आज लग्न झाले असून ते दोघे त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत. त्यांना तैमूर हा मुलगा असून करिना आणि सैफ त्यांच्या व्यग्र चित्रीकरणातून वेळ काढून जास्तीत जास्त वेळ त्याला देण्याचा प्रयत्न करतात. सैफसोबत लग्न होण्याआधी करिना आणि शाहिद कपूरच्या प्रेमप्रकरणाची चांगलीच चर्चा झाली होती. जब वी मेट या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या ब्रेकअपची बातमी मीडियात आली होती. करिना आणि शाहिदच्या ब्रेकअपमुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. या दोघांच्या ब्रेकअपनंतर काहीच वर्षांत करिनाच्या आयुष्यात सैफ अली आला.

rahul gandhi


करिना कपूरने रेफ्युजी या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. खरं तर तिचा पहिला चित्रपट हा कहो ना प्यार है हा होता. या चित्रपटासाठी तिने काही दिवस चित्रीकरण देखील केले होते. पण काही कारणास्तव तिने हा चित्रपट सोडला. करिना ही बॉलिवूडमधील हॉट अँड सेक्सी अभिनेत्री मानली जाते. करिना सीमी गरेवालच्या रँद्व्ह्यू विथ सीमी गरेवाल या कार्यक्रमात २००२ च्या सुमारास आली होती. कार्यक्रमाची सूत्रसंचालक सीमीने करिनाला विचारले होते की, तू सिंगल आहेस का आणि असशील तर या जगातील कोणाला तुला डेट करायला आवडेल. त्यावर करिनाने ती सिंगल असल्याचे आणि तिला कोणाला डेट करायला आवडेल असे सांगितले होते. तिला डेट करायला कोणत्या अभिनेत्याला नाही तर एका राजकारण्याला आवडेल अशी कबुली तिने या कार्यक्रमात दिली होती. हा राजकारणी दुसरा कोणीही नसून राहुल गांधी आहे. करिनाने या कार्यक्रमात सांगितले होते की, मी त्या व्यक्तीचे नाव घेऊ की नाही हे मला कळत नाही. पण इंडिया टुडे या मासिकात मी राहुल गांधी यांचे फोटो पाहिल्यापासून त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारण्याची माझी इच्छा आहे. त्यांना जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. कपूर कुटुंबाच्या अनेक पिढ्या या चित्रपटसृष्टीत आहेत तर राहुल हे एका राजकीय घराण्यातून आले आहेत. त्यामुळे आमच्या गप्पा खूप चांगल्या रंगतील याची मला खात्री आहे. 

Also Read : कित्येक मॅसेज अन् फोन केल्यानंतर शाहिद कपूरने स्वीकारले होते करिना कपूरचे लव्ह प्रपोजल!

Web Title: Kareena Kapoor does not like an actor but a politician