करिना कपूरला पुन्हा सैफ अली खानसोबत शेअर करायची स्क्रिन, म्हणाली- आम्हाला एकत्र....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 16:31 IST2023-09-27T16:26:57+5:302023-09-27T16:31:11+5:30

kareena kapoor : करिनाने तिच्या आणि सैफमध्ये असलेल बॉन्डविषयी भाष्य केलं आहे.

kareena kapoor calls saif ali khan her most favourite person in world says our fondness for each other evident | करिना कपूरला पुन्हा सैफ अली खानसोबत शेअर करायची स्क्रिन, म्हणाली- आम्हाला एकत्र....

करिना कपूरला पुन्हा सैफ अली खानसोबत शेअर करायची स्क्रिन, म्हणाली- आम्हाला एकत्र....

बॉलिवूडमधील कपल गोल म्हणून अभिनेता सैफ अली खान ( saif ali khan) आणि करीना कपूर खान (kareena kapoor khan) या जोडीकडे पाहिलं जातं. शाहिद कपूरसोबत ब्रेकअप केल्यानंतर करीनाने सैफला डेट करण्यास सुरुवात केली.बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर करीना आणि सैफ या जोडीने २०१२ मध्ये लग्न केलं. विशेष म्हणजे आजदेखील या जोडीतलं प्रेम कायम असून त्यांच्यातील हे गोड नातं बऱ्याचदा दिसून येतं. अनेकदा सैफ आणि करीना उघडपणे त्यांच्या नात्यावर भाष्य करत असतात. यात अलिकडेच करिनाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने पती सैफसोबतच्या तिच्या बाँडिंगबद्दल सांगितले

अभिनेत्री करीना कपूर सध्या तिच्या ओटीटी डेब्यू चित्रपट 'जाने जां'मुळे चर्चेत आहे. अलिकडेच करिनाने एक मुलाखत दिली.
करिना कपूर म्हणाली की, ''ती आणि सैफ एकमेकांची कंपनी खूप एन्जॉय करतात. रिलेशनशिप किंवा वैवाहिक जीवनातील सर्व गरजा पूर्ण करण्याचा कोणताही छुपा फॉर्म्युला नाही. यात सगळ्यातं महत्वाचं आहे ते प्रेम. सैफ आणि माझे एकमेकांवरील प्रेम उघड आहे आणि ते  खूप महत्त्वचं आहे.''

करिना पुढे म्हणाली, आम्ही नेहमी एकमेकांच्या आजूबाजूला असताना त्याचा आनंद घेतो. आम्हाला एकमेकांशी बोलणे आणि एकत्र वेळ घालवणे आवडते. करीना कपूर म्हणते की, सैफ अली खान जगातील तिचा आवडता व्यक्ती आहे. करीना म्हणाली की मित्रांपेक्षा ती सैफची कंपनी जास्त एन्जॉय करते.

सैफ अली खानसोबत पुन्हा चित्रपटात काम करण्यास उत्सुक असल्याची कबुलीही करिनाने दिली आहे. करीना म्हणते की, सैफ अली खान एक कमाल अभिनेता आहे.''

Web Title: kareena kapoor calls saif ali khan her most favourite person in world says our fondness for each other evident