बस करो भाई, क्यों उसे इतनी इज्जत दे रहे हो? करिना कपूरचा अॅटिट्यूड पाहून नेटकर्यांची सटकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 16:01 IST2021-03-31T16:01:24+5:302021-03-31T16:01:49+5:30
Watch Video : मॅम, रूकिए ना... बहुत टाइम से खडे है, असे फोटोग्राफर्स म्हणत राहिले, पण करिना एक सेकंदही थांबली नाही...

बस करो भाई, क्यों उसे इतनी इज्जत दे रहे हो? करिना कपूरचा अॅटिट्यूड पाहून नेटकर्यांची सटकली
दुसर्या मुलाच्या जन्मानंतर महिनाभरातच करिना कपूर कामावर परतली. तेव्हापासून अनेकदा करिना बाहेर पडताना दिसली. यादरम्यानचे तिचे फोटो व व्हिडीओही व्हायरल झालेत. पण बेबोचा ताजा व्हिडीओ पाहून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. होय, बेबोचा अॅटिट्यूड पाहून लोकांची अशी काही सटकली की, बस करो भाई, क्यों इतनी इज्जत दे रहे हो? अशा काय काय कमेंट लोकांनी केल्या.
व्हिडिओत करिना कपूर काम संपवून तिच्या कारकडे जाताना दिसतेय. यादरम्यान बाहेर अनेक तासांपासून ताटकळत असलेले फोटोग्राफर्स तिला पोज देण्याची विनंती करतात. करिना मॅम, एक मिनिट रूकिए ना... मॅम, रूकिए ना... बहुत टाइम से खडे है, असे फोटोग्राफर्स म्हणतात. पण करिना एक सेकंदही थांबत नाही. अक्षरश: फोटोग्राफर्सकडे कानाडोळा करत आणि आपल्या टीमला बाय म्हणत ती आपल्याच तो-यात कारमध्ये जाऊन बसते. करिनाचा हा अॅटिट्यूड पाहून फोटोग्राफर्सची निराशा तर होणार. पण ते काहीही बोलले नाहीत. लोकांनी मात्र बेबोचा हा अॅटिट्यूड पाहून तिला जाम फैलावर घेतले.
एका युजरने बेबोचे हे वागणं पाहून फोटोग्राफर्सलाच सल्ला दिला. बस करो भाई, क्यूं इतनी इज्जत दे रहे हो, वो आपको नहीं दे रहीं इज्जत, असे या युजरने लिहिले. अन्य एका युजरने, ती अॅरोगेंट महिला आहे, असे म्हणत आपला संताप व्यक्त केला. व्हिडीओत करिनाचे पापा रणधीर कपूरही दिसत आहेत. टीममधील एक व्यक्ती त्यांना आधार देत असताना दिसतोय.
तुम्हाला ठाऊक आहेच की, करिनाने गेल्या 21 फेबु्रवारीला दुसर्या मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर महिनाभराने करिना कामात बिझी झाली आहे. लवकरच ती ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात दिसणार आहे.