सेल्फी घेणा-या चाहतीवर अशी भडकली ‘बेबो’ करिना कपूर; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 11:51 IST2020-03-12T11:50:59+5:302020-03-12T11:51:46+5:30

या व्हिडीओमुळे करिना चांगलीच ट्रोल होतेय.

kareena kapoor angry to fan when she clicked pictures trolled on social media-ram | सेल्फी घेणा-या चाहतीवर अशी भडकली ‘बेबो’ करिना कपूर; व्हिडीओ व्हायरल

सेल्फी घेणा-या चाहतीवर अशी भडकली ‘बेबो’ करिना कपूर; व्हिडीओ व्हायरल

ठळक मुद्देकरिनाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तिचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बॉलिवूडची बेबो करिना कपूरने नुकताच इन्स्टाग्राम डेब्यू केला आणि बघता बघता तिच्या फॉलोअर्सची संख्या 17 लाखांवर पोहोचली. यावरून करिनाच्या लाखो चाहते आहेत, याचा अंदाज आहे. तूर्तास करिना एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, करिनाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे करिना चांगलीच ट्रोल होतेय.
या व्हिडीओ करिना एका चाहत्यावर चिडलेली दिसत आहे. होय, होळी पार्टीनंतर करिना घराकडे रवाना होत असताना तिला चाहत्यांनी घेरले. व्हिडीओत तिच्यासोबत तैमूरही दिसतोय. दोन मुलींनी तिच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पण कदाचित करिना सेल्फी देण्याच्या मूडमध्ये नसावी. मग काय, करिना संतापली. अर्थात यानंतरही तिने या दोन्ही मुलींसोबत फोटो दिला. पण तिच्या चेह-यावरचा संताप मात्र स्पष्ट दिसला.

करिनाचा हा अवतार अनेकांना रूचला नाही. साहजिकच अनेकांनी तिला ट्रोल केले. ‘मला कळत नाही, या मुली हिच्यासोबत फोटो काढण्यासाठी इतक्या विनवण्या का करताहेत?’, असे एकाने लिहिले. ‘ज्या चाहत्यांच्या जीवावर हे लोक मोठे झालेत, त्यांनाच हे अ‍ॅटिट्यूड दाखवतात. एवढा सुद्धा गर्व करु नये,’ असे एका युजरने लिहिले.

काहींनी मात्र करिनाची बाजू घेतली. ‘ती अजिबात रूड नाही. कदाचित ती फोटो देण्याच्या मूडमध्ये नसावी. थकली असावी. पण या मुली अक्षरश: सेल्फीसाठी तुटून पडल्यात. अशात कुणालाही राग येईल,’ अशा शब्दांत एका युजरने करिनाची पाठराखण केली.

करिनाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तिचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात करिना पोलिस आॅफिसरच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेता इरफान खान आणि राधिका मदन हे सुद्धा या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.

Web Title: kareena kapoor angry to fan when she clicked pictures trolled on social media-ram