​बेबीबंपसह करिनाला मिळाले पुन्हा एकदा कव्हरपेजवर स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 21:22 IST2016-11-30T21:22:57+5:302016-11-30T21:22:57+5:30

kareena kapoor khan became the cover girl of grazia india; ‘ग्राझिया इंडिया’ मॅगझिनच्या बिग ब्युटी स्पेशल या इश्यूसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. कव्हर पेजवर ‘हे ममा करिना कपूर खान्स नेक्स्ट चाप्टर’ असे लिहले आहे.

Kareena gets back to the cover page with babybump | ​बेबीबंपसह करिनाला मिळाले पुन्हा एकदा कव्हरपेजवर स्थान

​बेबीबंपसह करिनाला मिळाले पुन्हा एकदा कव्हरपेजवर स्थान

ong>बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खानच्या डिलेव्हरीची तारीख जवळ येत असताना ती आणखीच सुंदर दिसू लागली आहे. तिच्या प्रेग्नेंसीचा आधार घेत अनेक मॅगझिनने फोटो शूट केले आहे. याच मालिकेत ती पुन्हा एकदा ‘ग्राझिया इंडिया’ या मॅगझिनच्या कव्हरपेजवर अवतरली आहे. 

करिना कपूर ही एकमेव बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे. जिच्या प्रेग्नेंसी नंतर प्रत्येक महिन्यात मॅगझिनच्या कव्हरपेजवर स्थान मिळविले आहे. सामान्यत: महिला प्रेग्नेंसीमध्ये आराम करण्यावर भर देतात, मात्र करिना याला अपवाद ठरली आहे. ती सर्व बंधनांना तोडून बॉलिवूडमध्ये सक्रिय असून काम करीत आहे. करिनाने प्रेग्नेंसी दरम्यान अनेक फोटोशूट केले आहेत. पती सैफ अली खान व बहिण करिश्मा कपूर सोबत एका मॅगझिनसाठी केलेला फोटोशूट चांगलाच गाजला होता. 

तिने नुकताच केलेल्या ‘ग्राझिया इंडिया’ मॅगझिनच्या बिग ब्युटी स्पेशल या इश्यूसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये ती काळ्या रंगाच्या स्किन फिटमध्ये असून तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. कव्हर पेजवर ‘हे ममा करिना कपूर खान्स नेक्स्ट चाप्टर’ असे लिहले आहे. 

">http://


आपल्या प्रेग्नेंसीच्या काळात ती अनेक पार्ट्यामध्येही उपस्थित होती. यासोबतच ग्लोबल इडिया या इव्हेंटला देखील तिने हजेरी लावली. नुकताच तिच्या घरी एका संमारभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देखील ती आपल्या सर्व नातलगांसोबत मस्ती करतानाच्या फ ोटोंनी मीडियात स्थान मिळविले होते. नुकतेच एका मुलाखतीमध्ये करिनाचे वडील रणधीर कपूर यांनी तिच्या डिलीव्हरीची तारीख सांगितली होती. 20 डिसेंबरला ती बाळंत होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. शिवाय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढचा निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले होते. 

Web Title: Kareena gets back to the cover page with babybump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.