करिनाचे आठव्या महिन्यातील फोटोशूट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 17:52 IST2016-11-20T17:52:52+5:302016-11-20T17:52:52+5:30

करिना कपूर खानचे फॅशनसोबतचे नाते काही औरच आहे. आता हेच पाहा ना...सध्या तिला ८वा महिना सुरू असतानाही तिने स्वत:चे ...

Karan's eighth month photo shoot! | करिनाचे आठव्या महिन्यातील फोटोशूट !

करिनाचे आठव्या महिन्यातील फोटोशूट !

िना कपूर खानचे फॅशनसोबतचे नाते काही औरच आहे. आता हेच पाहा ना...सध्या तिला ८वा महिना सुरू असतानाही तिने स्वत:चे फोटोशूट करण्यात काही वावगे वाटले नाही. बिनधास्त, बेधडक व्यक्तिमत्त्वाची बेबो ही तिचे गरोदरपण खऱ्या अर्थाने एन्जॉय करताना दिसतेय. तिने नुकतेच एका साप्ताहिकासाठी फोटोशूट केले असून त्यात तिचे बेबी बम्प छान दिसतेय. तसेच तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसतोय. 

या फोटोमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या टीशर्ट आणि ट्रॅक पँटमध्ये दिसत असून, तिने तिच्या बेबी बम्पला अतिशय प्रेमाने धरले आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आत्तापर्यंतच्या कुठल्याही चित्रपटाला मिळालेल्या यशापेक्षा लाखपटीने जास्त आहे. 

करिना कपूर ही फार वर्षांपासून बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट देत आलीये. तिच्या नावाला ‘खान’ नाव जोडले गेले आणि तिच्या चित्रपटांना एक वलय निर्माण झाले. कारण ती केवळ करिना कपूर न राहता पतौडी खानदानाची सून झाली होती. आता मात्र या पतौडी हाऊसमध्ये त्यांच्या वारसदाराच्या आगमनाची वाट पाहणे सुरू असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसतेय. 



 

Web Title: Karan's eighth month photo shoot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.