"शाहरुखपेक्षा खूप वेगळा...", करण जोहरने केलं आर्यन खानचं कौतुक, दिग्दर्शनात पदार्पण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 14:29 IST2025-05-07T14:28:19+5:302025-05-07T14:29:00+5:30

आर्यनच्या स्वभावाबद्दल करण जोहर म्हणाला,...

karan johar talks about aryan khan says he is different from shahrukh dosent carry baggage of his father | "शाहरुखपेक्षा खूप वेगळा...", करण जोहरने केलं आर्यन खानचं कौतुक, दिग्दर्शनात पदार्पण करणार

"शाहरुखपेक्षा खूप वेगळा...", करण जोहरने केलं आर्यन खानचं कौतुक, दिग्दर्शनात पदार्पण करणार

करण जोहर (Karan Johar) हा फिल्म इंडस्ट्रीतला लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. यशस्वी दिग्दर्शक, निर्माता अशी त्याची ओळख आहे. गेल्या दोन दशकांपासून तो एकापेक्षा एक चांगले सिनेमे घेऊन येत आहे. करण आणि शाहरुख खानची मैत्री तर सर्वश्रुत आहे. शाहरुखला घेऊनच करणने त्याचा सिनेसृ्ष्टीतला प्रवास सुरु केला. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कुछ कुछ होता है' सारखे आयकॉनिक सिनेमे दिले. आता शाहरुखचा मुलगा आर्यन खानही (Aryan Khan) सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. आर्यनबद्दल नुकतंच करण जोहरने प्रतिक्रिया दिली आहे. 

भारतीय सिनेमातील उभरत्या टॅलेंटबद्दल बोलताना करण जोहरने आर्यन खानची स्तुती केली. राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "आर्यन खान खान माझा पहिला मुलगाच आहे.  'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजचं दिग्दर्शन करत आहे. सगळ्या तरुणांना मी एकच सांगेन की सावध राहा. जर कोणी राजा आहे तर राजकुमार असणारच.  आर्यन  तो २० तास काम करतो. मला त्याच्या टॅलेंटवर विश्वास आहे. मी हे म्हणतोय कारण मी तो शो पाहिला आहे.  तो त्याचं वैयक्तिक आयुष्य खूप खाजगी ठेवतो त्यामुळे मी त्याच्याविषयी फार काही बोलणार नाही. त्याच्यासाठी कामापेक्षा मोठं काहीच नाही. तो खूप मेहनती आहे. त्याला जिंकायचं आहे."

आर्यनच्या स्वभावाबद्दल करण जोहर म्हणाला, "अपयश आलं तर आर्यनच्या ते खूप जिव्हारी लागतं. यश मिळालं तर तो प्रभावित होतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत त्याचा आवाजही वेगळा आहे. त्याच्यात शाहरुखचा मुलगा असा आविर्भाव अजिबात नसतो. त्याचं वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि तो शांतपणे त्याचं काम करतो. शाहरुख खानचा वारस असल्याचा दबाव तो स्वत:वर येऊ देत नाही."

आर्यन खान दिग्दर्शित करत असलेल्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजमध्ये लक्ष्य, मोना सिंह आणि  बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहेत. शिवाय बॉलिवूडमधील इतर अनेक स्टार्स यामध्ये कॅमिओ करणार आहेत. नेटफ्लिक्सवर ही सीरिज रिलीज होणार आहे.

Web Title: karan johar talks about aryan khan says he is different from shahrukh dosent carry baggage of his father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.