अनोखा निर्णय! करण जोहरने गुपचूप काढलाय शरीराच्या 'या' भागाचा विमा, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 09:05 IST2025-06-08T09:04:47+5:302025-06-08T09:05:03+5:30

करण जोहरने विमा काढलाय, पण कोणत्या गोष्टीचा? वाचा सविस्तर!

Karan Johar Reportedly Gets Face Insurance At 53 And Insurance Process Reportedly Took Place In South Korea | अनोखा निर्णय! करण जोहरने गुपचूप काढलाय शरीराच्या 'या' भागाचा विमा, वाचा सविस्तर!

अनोखा निर्णय! करण जोहरने गुपचूप काढलाय शरीराच्या 'या' भागाचा विमा, वाचा सविस्तर!

Karan Johar: बॉलिवूडमध्ये कोण, कधी, काय करेल हे  सांगता येत नाही. असाच एक अभिनेत आहे, ज्यानं शरीराच्या विशिष्ट भागाचा विमा काढला आहे. तो अभिनेता आहे करण जौहर.  आज हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध निर्मात्यांपैकी एक करण जोहर आहे. त्याने 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'ऐ दिल है मुश्किल' यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तो नेहमीच फॅशन, ट्रेंड आणि त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहतो.  आता शरीराच्या विशिष्ट भागाचा विमा काढल्यानं तो चर्चेत आला आहे. 

एका व्हायरल रेडिट पोस्टनुसार, करण जोहरने त्याच्या चेहऱ्याचा विमा (Karan Johar’s Face Insurance ) काढला आहे.  व्हायरल पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दक्षिण कोरिया गेला होता, तेव्हा त्यानं तिथे चेहऱ्याचा विमा काढला. मात्र, करण जोहरकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. तरीही या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

चेहऱ्याचा विमा म्हणजे काय?
आजकाल सेलिब्रिटींमध्ये त्यांच्या शरीराच्या विशिष्ट भागाचा विमा काढण्याचा ट्रेंड वाढतो आहे.  शूटिंगदरम्यान झालेल्या अपघातांमुळे चेहऱ्याला झालेल्या नुकसानामुळे मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. यामुळे अनेक सेलिब्रिटी त्यांचा अवयवांचा विमा काढतात. विमा कंपन्याही आता खास अशा पॉलिसी देत आहेत, ज्या चेहऱ्यावरील दुखापत, जखमा किंवा इतर शारीरिक बदलांचं संरक्षण करतात.

 विमा काढणारा  करण जोहर एकटा नाही!
करण जोहर हा आपल्या अवयवांचा विमा काढणारा पहिला भारतीय सेलिब्रिटी नाही. याआधी बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी त्यांचा आवाजाचा विमा काढला आहे. याशिवाय अभिनेता जॉन अब्राहमने त्याच्या कंबरेचा विमा घेतल्याचं म्हटलं जातं. हॉलिवूडमध्ये तर अशा प्रकारे विमा काढणे सामान्य मानले जाते.  या प्रकारच्या विम्यांमागे उद्देश  ब्रँडची सुरक्षितता आणि आर्थिक नुकसान टाळणे हा असतो. 

करणच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच ओटीटीवर 'द ट्रेटर्स' या नव्या रिएलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द ट्रेटर्स'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. प्राइम व्हिडीओवरील या रिएलिटी शोचं सूत्रसंचालन बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर करताना दिसणार आहे. ३० हून अधिक देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या 'द ट्रेटर्स' या रिएलिटी शोचं भारतीय व्हर्जन आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये २० सेलिब्रिटींची वर्णी लागली आहे. 

Web Title: Karan Johar Reportedly Gets Face Insurance At 53 And Insurance Process Reportedly Took Place In South Korea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.