आलिया भट्टच्या वाढदिवसाला करण जोहरने दिले 'हे' खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 12:20 IST2018-03-15T06:50:22+5:302018-03-15T12:20:22+5:30

आलिया भट्टच्या वाढदिवसाला तिचा मित्र आणि निर्माता करण जोहरने एक खास गिफ्ट दिले आहे. करण जोहरने आलिया भट्टचा आगामी ...

Karan Johar gave a special gift to Alia Bhatt's birthday | आलिया भट्टच्या वाढदिवसाला करण जोहरने दिले 'हे' खास गिफ्ट

आलिया भट्टच्या वाढदिवसाला करण जोहरने दिले 'हे' खास गिफ्ट

िया भट्टच्या वाढदिवसाला तिचा मित्र आणि निर्माता करण जोहरने एक खास गिफ्ट दिले आहे. करण जोहरने आलिया भट्टचा आगामी चित्रपट 'राजी'चा फर्स्टलूक शेअर केला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट काश्मिरी मुलीची भूमिका साकारत आहे. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन गुलजार यांची मुलगी मेघना गुलजार करते आहे. मेघनाने याआधी फिलहाल आणि तलवार सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. यात आलिया आणि विक्की कौशल यांची मुख्य भूमिका आहे. विक्की कौशलने याआधी मसान आणि रमन राघव सारख्या चित्रपटात काम केले आहे. तर राजीमधून आलिया पहिल्यांदाच आपली आई सोनी राजदानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. आलियाचा विवाह पकिस्तानी लष्कर अधिकाºयाशी होतो. 1971साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान आलिया भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी अधिकाºयांना देते, असे याचे कथानक आहे. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सहमत या कांदबरीवर आधारित आहे. या पाकिस्तानी अधिकाऱ्याची भूमिका विक्की कौशल साकारतो आहे. हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन प्रोड्यूस करतो आहे. 
  सध्या आलिया त्याचा आगामी चित्रपट ‘गली बॉय’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तिच्यासोबत रणवीर सिंगसुद्धा दिसणार आहे.  एका स्ट्रिट रॅपरची कथा असल्याचे कळतेय. जी एका रिअल लाईफ स्टोरीवर बेतलेली आहे. ही कथा गेल्या अनेक वर्षांपासून जोयाच्या डोक्यात होत्या. या चित्रपटासाठी आधी रणबीर कपूरचे नाव चर्चेत होते. यानंतर वरूण धवनच्या नावाचीही चर्चा झाली आणि सरतेशेवटी रणवीरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. रणवीर व आलिया या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात रणवीर व आलिया यांच्यासोबतच अभिनेत्री कल्की कोच्लिन ही सुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. चर्चा खरी मानाल तर कल्की यात एका रॅपरच्या भूमिकेत दिसेल. यापूर्वी कल्कीने जोयाच्या ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’मध्ये काम केले आहे.

Web Title: Karan Johar gave a special gift to Alia Bhatt's birthday