"मी सलमानसमोर ढसाढसा रडलो कारण..." करण जोहरने सांगितला भाईजानचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 10:39 AM2023-09-21T10:39:54+5:302023-09-21T10:40:54+5:30

सलमान खानचा लहरीपणा आणि करण जोहरवर आली ढसाढसा रडण्याची वेळ

karan johar cried in front of salman khan while shooting for song saajan ji ghar aaye in kuchh kuchh hota hai | "मी सलमानसमोर ढसाढसा रडलो कारण..." करण जोहरने सांगितला भाईजानचा किस्सा

"मी सलमानसमोर ढसाढसा रडलो कारण..." करण जोहरने सांगितला भाईजानचा किस्सा

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये सलमान खानचा (Salman Khan) चांगलाच दबदबा आहे. त्याच्या एका इशाऱ्यावर अनेक सूत्र हलतात. सलमान खान जितका कडक वाटतो तितकाच तो मैत्री जपणाराही आहे. एखाद्याला मित्र मानलं तर तो त्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतो. शाहरुख आणि त्याची मैत्री तर सर्वश्रुत आहेच. मधल्या काळात त्यांच्यात फूट पडली होती. मात्र बऱ्याच वर्षांनी ते पुन्हा करण अर्जुनसारखे एकत्र आले. तर दुसरीकेडे सलमान खानने करण जोहरच्याही (Karan Johar) मैत्रीखातर एक मोठी गोष्ट केली. एका चित्रपटाच्या सेटवर करण अक्षरश: ढसाढसा रडलाही होता.

दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने नुकतंच एका मुलाखतीत सांगितले,'कुछ कुछ होता है सिनेमासाठी मी अमनच्या भूमिकेसाठी अनेकांना विचारलं. सैफ अली खानलाही विचारणा केली मात्र त्याने साफ नकार दिला. अखेर जेव्हा मी सलमान खानकडे गेलो तिथेही मला नकारच मिळेल वाटलं होतं. पण सलमानने मला जब प्यार किसी से होता है सिनेमाच्या सेटवर बोलवलं. सलमान सेटवर सकाळी ९ वाजता येणार होता म्हणून मी ८.३० लाच पोहोचलो. तर तो थेट संध्याकाळीच आला. नंतर मी त्याच्या घरी गेलो. तिथे स्क्रीप्ट वाचून दाखवली. त्याने लगेच होकार दिला.'

तो पुढे म्हणाला,' कुछ कुछ होता है मधील साजन जी घर आए  गाण्याच्या शूटवेळी एक वेगळाच किस्सा घडला ज्यामुळे मी अक्षरश: सलमानसमोर रडलो. सलमान सेटवर फाटकी जीन्स आणि काळा शर्ट घालून आला होता. खरंतर त्याच्यासाठी खास सूट तयार करण्यात आला होता मात्र तो घालण्यास त्याने नकार दिला. याआधी कोणी केलं नाही पण आज मला हीच जीन्स आणि शर्ट घालायचाय असं तो म्हणाला. मला त्याला काहीही सांगण्याची भीतीच वाटत होती. दुल्हा फाटक्या जीन्समध्ये कसा दिसेल. भव्य सेट आहे, हिरोईन भरजरी घागरा घालून येणार आहे. कसं वाटेल ते. शेवटी मी सलमानसमोर ढसाढसा रडलो. शेवटी तो म्हणालाच की मी सूट घालतो पण तुझं हे रडणं बंद कर'.

'कुछ कुछ होता है' सिनेमात शाहरुख खान आणि काजोल मुख्य भूमिकेत आहेत. त्यांची लव्हस्टोरी दाखवली आहे. तर अमन ही व्यक्तिरेखा सहाय्यक अभिनेत्याची आहे. शाहरुखसोबत तेव्हा सहाय्यक भूमिका करायला कोणीच तयार होत नव्हतं. मात्र सलमानने करण जोहरसाठी ती भूमिका केली. सलमानची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

Web Title: karan johar cried in front of salman khan while shooting for song saajan ji ghar aaye in kuchh kuchh hota hai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.