करण जोहर ‘आॅटोबायोग्राफी’ : लैंगिकतेविषयी करणार का तो खुलासा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 11:45 IST2016-12-30T11:32:31+5:302016-12-30T11:45:42+5:30

दिग्दर्शक, पटकथाकार, निर्माता, रिअ‍ॅलिटी शो जज, अवॉर्ड शो होस्ट, चॅट शो होस्ट असा मल्टीपल पर्सनालिटी असणारा करण जोहर आता ...

Karan Johar 'Autobiography': Why it's about sexuality? | करण जोहर ‘आॅटोबायोग्राफी’ : लैंगिकतेविषयी करणार का तो खुलासा?

करण जोहर ‘आॅटोबायोग्राफी’ : लैंगिकतेविषयी करणार का तो खुलासा?

ग्दर्शक, पटकथाकार, निर्माता, रिअ‍ॅलिटी शो जज, अवॉर्ड शो होस्ट, चॅट शो होस्ट असा मल्टीपल पर्सनालिटी असणारा करण जोहर आता पुस्तक लेखक म्हणूनही आपल्या समोर येणार आहे. सध्या बॉलीवूडमध्ये बायोपिक बरोबरच बायोग्राफी लिहिण्याचा ट्रेंड आला आहे. त्यानुसार करणदेखील पुढील महिन्यात त्याची जीवनगाथा पुस्तकरुपी प्रकाशित करणार आहे.

होय! करण जोहर आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से पुस्तकात लिहिणार आहे. ‘अ‍ॅन अनसुटेबल बॉय’ नावाने त्याची बायोग्राफी जानेवारी महिन्यात लाँच होणार आहे. विशेष म्हणजे याच दरम्यान ऋषी कपूर यांची आॅटो-बायोग्राफीसुद्धा प्रकाशित होणार आहे.

करणने पूनम सक्सेनासोबत मिळून हे आत्मचरित्र लिहिले आहे. त्यामध्ये त्याने बालपण, वाढत्या वयातील अनुभव, वादविवादामध्ये अडकल्यानंतर आलेल्या अडचणी आणि त्यावर त्याने कशी मात केली याचे सविस्तर वर्णन केले असल्याचे कळतेय. तुमच्या या लाडक्या सेलिब्रेटीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी थोडा धीर धरावा लागेल.

सोशल मीडियावर या घोषणेचे चांगलेच पडसाद उमटत आहेत. करणविषयी असणारे अनेक समज-गैरसमज, लैंगिकतेविषयी चर्चा अफवांना या बायोग्राफीद्वारे पूर्णविराम लागेल, अशी जवळच्या सुत्रांनी माहिती दिली आहे. शाहरुख खान, आदित्य चोप्रा, अपूर्व मेहता, गौरी खान, मनीश मल्होत्रा अशा अत्यंत जवळच्या मित्रांविषयीदेखील तो लिहिणार आहे.

                                                    karan johar autobiography cover
                                                    अ‍ॅन अनसुटेबल बॉय : करण जोहर

या वर्षी बऱ्याच अडचणींनंतर प्रदर्शित झालेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ला मिळालेल्या यशाने तो फार खुश आहे. त्याच्या बॅनरमध्ये तयार झालेल्या ‘कपूर अँड सन्स’लादेखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. दुसरीकडे त्यांचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’ची लोकप्रियतादेखील वाढली आहे.
 
बॉलीवूडमधील काही प्रसिद्ध बायोग्राफीज् :

नसीरुद्दीन शहा - अँड देन वन डे : अ मेम्वायर

करिना कपूर -  द स्टाइल डायरी आॅफ बॉलीवूड डिवा

दिलीप कुमार - द सब्स्टन्स अँड द शॅडो

ममता कुलकर्णी - अ‍ॅन आॅटोबायोग्राफी आॅफ अ योगिनी

प्रेम चोप्रा - प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा

आयुषमान खुराणा - क्रॅकिंग द कोड : माय जर्नी इन बॉलीवूड

देव आनंद - रोमॅन्सिंग विथ लाईफ

जावेद अख्तर - क्विव्हर

सत्यजित रे - चाईल्डहूड डेज्...अ मेम्वॉयर

Web Title: Karan Johar 'Autobiography': Why it's about sexuality?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.