​‘बाहुबली’च्या हिरोईनने सोडली कपिल शर्माची साथ, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 17:04 IST2016-12-05T17:04:36+5:302016-12-05T17:04:36+5:30

‘बाहुबली’च्या हिरोईनने सोडली कपिल शर्माची साथ...होय, ऐकता ते खरे आहे. ‘बाहुबली’ची ही हिरोईन म्हणजे अभिनेत्री तमन्ना भाटिया. कपिल शर्मा ...

Kapil Sharma's 'Heroic' by Hiruni, but why? | ​‘बाहुबली’च्या हिरोईनने सोडली कपिल शर्माची साथ, पण का?

​‘बाहुबली’च्या हिरोईनने सोडली कपिल शर्माची साथ, पण का?

ाहुबली’च्या हिरोईनने सोडली कपिल शर्माची साथ...होय, ऐकता ते खरे आहे. ‘बाहुबली’ची ही हिरोईन म्हणजे अभिनेत्री तमन्ना भाटिया. कपिल शर्मा त्याच्या दुस-या चित्रपटात तमन्नासोबत रोमान्स करताना दिसणार, अशी खबर होती. मात्र कदाचित आता असे होऊ शकणार नाही.
‘किस किसको प्यार करू’ हा कपिल शर्माचा पहिला चित्रपट होता. यात कपिल चार हिरोईन्ससोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसला होता. आता कपिलने दुसरा सिनेमा साईन केल्याची खबर आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘फिरंगी’.  ‘फिरंगी’मध्ये कपिल एक नाही तर दोन अभिनेत्रींशी रोमान्स करताना दिसणार आहे. यात पहिली हिरोईन म्हणजे तनुश्री दत्ताची बहीण इशिता दत्ता आणि दुसरी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. पण कदाचित कपिल व तमन्नाची जोडी पडद्यावर एकत्र बघण्यास प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार. कारण तमन्नाने डेट्स नसल्याच्या कारणावरून हा चित्रपट नाकारल्याची माहिती आहे. सूत्रांचे मानाल तर, डेट्स तर एक बहाणा आहे. खरे कारण म्हणजे, तमन्ना समांतर भूमिका करण्यास जराही इच्छूक नाहीय. म्हणजेच इशितासोबत काम करण्यास तिला जराही इंटरेस्ट नाहीय. त्यामुळेच तिने हा सिनेमा सोडल्याचे कळतेय.

लवकरच ‘फिरंगी’चे शूटींग सुरु होतेयं. आता तमन्नाने हा चित्रपट सोडला म्हणजे, मेकर्सला कपिलची हिरोईन म्हणून आणखी नव्या अभिनेत्रीचा शोध घ्यावा लागणार. आता हा शोध कुठे येऊन थांबतो, ते बघूयात.

 या चित्रपटाची दुसरी हिरोईन इशिता दत्ता ही अजय देवगणच्या ‘दृश्यम’मध्ये दिसली होती. यात तिने अजयच्या मुलीची भूमिका साकारली होती. आता इशिता कपिलसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 

 

Web Title: Kapil Sharma's 'Heroic' by Hiruni, but why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.