Video: "तुने मुझे बुलाया.."; वैष्णोदेवी मंदिरात नवरात्रीनिमित्त कपिल शर्माने गायलं भजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 11:16 IST2024-04-16T11:14:01+5:302024-04-16T11:16:14+5:30

कपिल शर्माने नवरात्रीनिमित्त वैष्णोदेवी मंदिरात गायलं भजन, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (kapil sharma, vaishno devi)

kapil sharma sing devi bhajan at vaishno devi temple video viral | Video: "तुने मुझे बुलाया.."; वैष्णोदेवी मंदिरात नवरात्रीनिमित्त कपिल शर्माने गायलं भजन

Video: "तुने मुझे बुलाया.."; वैष्णोदेवी मंदिरात नवरात्रीनिमित्त कपिल शर्माने गायलं भजन

सध्या नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. अनेक लोकं नवरात्रीचं व्रत करत आहेत. अशातच प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मानेही त्याच्या व्यस्त दिनक्रमातून वेळात वेळ काढून वैष्णोदेवी मातेेच्या दर्शनाला गेला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी गिन्नीही होती. कपिल कॉमेडीयन आहेच हे सर्वांना ठाऊक आहे. पण तो उत्तम गायकही आहे. कपिलने वैष्णोदेवीच्या मंदिरात सुंदर भजन गात सर्वांना मंत्रमुग्ध केलं.

श्री माँ वैष्णो देवी नावाच्या एका इंस्टाग्राम हँडलवरून अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये कपिल शर्मा माँ वैष्णो देवीची पूजा करताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तो माता राणीची गाणी गाताना दिसतोय. त्याच्यासोबत भजन मंडळीही दिसत आहेत. कपिलने 'आशा' चित्रपटातील 'तुने मुझे बुलाया' गाण्यासह इतर अनेक भक्तिगीतं गायली. कपिल शर्माने पत्नी आणि मुलांसह माता वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

कपिल शर्माची देवी मातेवर नितांत श्रद्धा आहे. नवरात्रीच्या निमित्ताने कपिल सप्तमीच्या दिवशी वैष्णोदेवीला पोहोचला. कडेकोट बंदोबस्तात कपिल शर्मा माता वैष्णोदेवी मंदिरात पोहोचला होता. त्याने प्रिंटेड कुर्ता घातला होता. कपिलला मंदिरात पाहून लोकांना खूप आनंद झाला. कपिल शर्मा सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभा राहिला. आणि कोणतीही घाईगडबड न करता त्याने पत्नी व मुलांसह आशीर्वाद घेतले.

 

Web Title: kapil sharma sing devi bhajan at vaishno devi temple video viral