​कपिल शर्मा पुन्हा डिप्रेशनमध्ये? ‘फिरंगी’चे झाले निमित्त??

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 13:52 IST2017-12-03T08:20:59+5:302017-12-03T13:52:09+5:30

स्टार कॉमेडियन कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. होय, कपिल शर्माच्या आयुष्यात अद्यापही सगळे काही आॅल-वेल नाहीयं, ...

Kapil Sharma again in the depression? 'Firangi' on occasion? | ​कपिल शर्मा पुन्हा डिप्रेशनमध्ये? ‘फिरंगी’चे झाले निमित्त??

​कपिल शर्मा पुन्हा डिप्रेशनमध्ये? ‘फिरंगी’चे झाले निमित्त??

टार कॉमेडियन कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. होय, कपिल शर्माच्या आयुष्यात अद्यापही सगळे काही आॅल-वेल नाहीयं, असेच दिसतेय. कपिल पुन्हा डिप्रेशनमध्ये गेल्याची चर्चा होतेय. चर्चा खरी मानाल तर, ‘फिरंगी’ या चित्रपटाकडून कपिलला प्रचंड अपेक्षा होत्या. पण बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे कपिल पुन्हा एकदा डिप्रेशनमध्ये गेल्याचे बोलले जातेय. अलीकडे एका मीडिया हाऊसला कपिलच्या डिप्रेशनचा फटका बसला. या मीडिया हाऊसच्या दिल्लीतील कार्यक्रमाला कपिल हजर राहणार होता. कपिलने यास होकार दिला होता. अगदी व्यावसायिक पद्धतीने हा करार झाला होता. आयोजकांनी दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलात कपिलची व्यवस्था केली होती. मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असे त्याच्या विमान प्रवासाचे तिकिटही तयार होते. पण अखेरच्या क्षणी कपिलच्या टीमने आयोजकांना कपिल येणार नसल्याची खबर दिली. 
संबंधित मीडिया हाऊनसने कपिलच्या अशा वागणुकीबद्दल कमालीचा संताप व्यक्त केला आहे. आम्ही अचंबित आहोत. आम्ही एकदा नाही तर तिनदा तिकिटे बुक केलीत. एकूण सात वेळा तिकिटांचे बुकिंग झाले. पण अखेर कपिलने ऐनवेळी कार्यक्रमास येण्यास नकार दिला, असे आयोजकांनी म्हटले आहे. कपिलच्या टीममधील एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘फिरंगी’ला मिळालेला अल्प प्रतिसाद पाहून कपिल नाराज आहे. तो पुन्हा डिप्रेशनमध्ये गेलाय आणि याचमुळे तो या इव्हेंटला गेला नाही. तुम्हाला माहिती असेलच की, कपिलने ‘फिरंगी’ प्रोड्यूस केला होता.  

ALSO READ : ​‘त्या’ दिवशी कपिल शर्माने केला होता आत्महत्येचा विचार!

गेल्या आठ दिवसांत कपिल शर्माच्या करिअरची गाडी रूळांवरून घसरली आहे. ‘फिरंगी’च्या प्रमोशनदरम्यान ती हळूहळू रूळावर येतेयं, असे वाटत असताना या चित्रपटाच्या अपयशाने कपिलला पुन्हा धक्का दिला आहे. आधी कपिलचा सुनील ग्रोवरसोबत वाद झाला होता. सुनील शो सोडून गेला आणि कपिलच्या शोचा टीआरपी घसरला होता. त्यातून कसाबसा सावरत नाही तोच कपिलला आजारपणाने (?) घेरले होते. डिप्रेशन, वाढते ब्लडप्रेशर, ताण अशा सगळ्यांमुळे कपिलच्या शोचे शूट वारंवार रद्द होऊ लागले होते.  अखेर कपिलचा शो आॅफ एअर करण्याचा निर्णय संबंधित चॅनलने घेतला होता.

Web Title: Kapil Sharma again in the depression? 'Firangi' on occasion?