प्रेमसंबंधाला भावाने विरोध केल्याने या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली भावाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 22:02 IST2021-04-27T13:16:10+5:302021-04-30T22:02:41+5:30

ही हत्या अतिशय निघृणपणे करण्यात आली असून त्याच्या मृतदेहाचे तुकडे विविध ठिकाणी फेकण्यात आलेले आहेत.

Kannada actress Shanaya Katwe held for brother's gruesome murder | प्रेमसंबंधाला भावाने विरोध केल्याने या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली भावाची हत्या

प्रेमसंबंधाला भावाने विरोध केल्याने या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली भावाची हत्या

ठळक मुद्देराकेशचा खुन झाला त्या दिवशी शनाया तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होती तर हा खुन राकेश आणि तिच्या हुबळी येथील घरात झाला.

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्रीला नुकतेच अटक करण्यात आले असून तिच्या भावाची हत्या केल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री शनाया काटवेला तिचा भाऊ राकेश काटवेच्या खुनप्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली आहे. शनायाने 2018 मध्ये कन्नड चित्रपट ‘इडम प्रेमम जीवनम’ या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले आणि अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘ओंदू घनतेया काथे’ या एडल्ड कॉमेडी मुव्हीमध्ये ती दिसली होती.

राकेशची हत्या अतिशय निघृणपणे करण्यात आली असून त्याच्या मृतदेहाचे तुकडे विविध ठिकाणी फेकण्यात आलेले आहेत. देवरगुडीहल वनक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेत त्याचं डोकं आढळलं तर शरीराचा इतर भाग हुबळीतील गाडग रोड आणि इतर परिसरात आढळून आला. राकेशच्या मृतदेहाचे तुकडे मिळाल्यानंतर धारवड पोलिसांनी नियाझ अहमद कटिगार, तौसिफ चन्नापूर, अल्ताफ मुल्ला आणि अमन गिरणीवाले या चार संशयितांना अटक केली. 

पोलिसांनी संशयितांची चौकशी केली असता नियाझ अहमद कटिगार आणि अभिनेत्री शनाया काटवे यांच्यात प्रेमसंबंध असून त्यांच्या नात्याला राकेशचा विरोध असल्याची माहिती मिळाली. यामुळेच त्याने ही हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.

राकेशचा खुन झाला त्या दिवशी शनाया तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होती तर हा खुन राकेश आणि तिच्या हुबळी येथील घरात झाला. त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावण्यात आली. 

Web Title: Kannada actress Shanaya Katwe held for brother's gruesome murder