लोकप्रिय कॉमेडियनचे निधन, पाच महिन्यांत घटवले होते 35 किलो वजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 10:09 IST2020-04-07T10:06:30+5:302020-04-07T10:09:03+5:30
दुःखद

लोकप्रिय कॉमेडियनचे निधन, पाच महिन्यांत घटवले होते 35 किलो वजन
कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कॉमेडियन बुलेट प्रकाश यांचे निधन झाले. काल सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने साऊथ सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
मागच्या काही दिवसांपासून 44 वर्षांचे बुलेट प्रकाश हे लिव्हर इन्फेक्शनमुळे हॉस्पिटलमध्ये होते. पण सोमवारी दुपारी त्यांचा लिव्हर फेल झाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बुलेट प्रकाश यांनी गेल्या पाच महिन्यांत 35 किलो वजन कमी केले होते. याकाळात शरीरावर अतिरिक्त ताण पडल्याने त्याच्या आरोग्यविषयक अडचणी वाढल्या होत्या. अशात लिव्हरमध्ये इन्फेक्शन झाल्याने त्यांना गत 31 मार्चला रूग्णालयात भरती करण्यात आले होते. यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यांच्या अनेक अवयवांनी हळूहळू काम करणे बंद केले. सोमवारी सकाळी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
बुलेट प्रकाश यांनी ‘ध्रुव’ या कन्नड सिनेमातून डेब्यू केला होता. त्यांनी आतापर्यंत 300 पेक्षा जास्त सिनेमात काम केले होते. कन्नड सिनेमात ते केवळ कॉमेडीमुळे नाही तर शानदार बॉडी लँग्वेजमुळेही सगळ्यांच्या पसंतीत उतरले होते. त्यांचा प्रत्येक अंदाज प्रेक्षकांना भावला. 2015 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश करत राजकीय इनिंग सुरु केली होती.
म्हणून पडले होते बुलेट हे नाव
बुलेट प्रकाश हे नेहमीच बुलेट चालवत. त्यांचे बुलेट प्रेम पाहून त्यांना बुलेट हे नाव पडले होते.