OMG! कनिका कपूरच्या तब्येतीबाबत आला नवा रिपोर्ट, वाचा काय आहे यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 11:59 IST2020-03-31T11:55:00+5:302020-03-31T11:59:58+5:30

कनिका कपूरची आता तब्बल पाचव्यांदा कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली आहे.

Kanika Kapoor Tests COVID-19 Positive for 5th Time PSC | OMG! कनिका कपूरच्या तब्येतीबाबत आला नवा रिपोर्ट, वाचा काय आहे यात

OMG! कनिका कपूरच्या तब्येतीबाबत आला नवा रिपोर्ट, वाचा काय आहे यात

ठळक मुद्देकनिकाची पाचवी चाचणी देखील पॉझिटिव्ह आली असल्याने तिच्या कुटुंबियातील मंडळी चिंतेत आहेत. पण घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

कनिका कपूरची आता तब्बल पाचव्यांदा कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली आहे. याआधीच्या सगळ्याच चाचणीत तिला कोरोना झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण तरीही आता पाचव्यांदा तिची चाचणी करण्यात आली आहे. पाचवी चाचणी देखील पॉझिटिव्ह आली असल्याने तिच्या कुटुंबियातील मंडळी चिंतेत आहेत. पण घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

कनिकावर लखनऊमधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू आहेत. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे डायरेक्टर आर.के. धिमान यांनी काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना सांगितले होते की, कनिकाचे दोन रिपोर्ट जोपर्यंत निगेटिव्ह येत नाहीत, तोपर्यंत तिच्यावर उपचार सुरूच राहाणार आहेत. 

कनिका कपूरचे कोरोनाचे रिपोर्ट सगळ्यात पहिल्यांदा पॉझिटिव्ह आल्यानंतर ते रिपोर्ट कनिकाचेच आहेत का असा प्रश्न तिच्या घरातल्यांना पडला होता. कारण या रिपोर्टमध्ये मुलगीऐवजी मुलगा असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे तिची कोरोनाची चाचणी पुन्हा एकदा करण्यात आली होती. या चाचणीत देखील तिला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले होते. 

कनिकाने इन्स्टाग्रामवर काही दिवसापूर्वी एक पोस्ट लिहिली होती आणि त्यात म्हटले होते की, गेल्या चार दिवसांपासून मला ताप येत असल्याने मी कोरोनाची टेस्ट केली असून ती पॉझिटिव्ह आली आहे. मी आणि माझे कुटुंब सध्या सगळ्यांपासून पूर्णपणे वेगळे राहात असून डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकत आहोत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांची देखील तपासणी केली जाईल. दहा दिवसांपूर्वी परदेशातून परतल्यावर विमानतळावर माझे स्कॅनिंग करण्यात आले होते. पण त्यावेळी कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. मी घरी येऊन दहा दिवस झाले असून गेल्या चार दिवसांपासून माझ्या शरीरात कोरोनाची लक्षणं जाणवत आहेत. मी सगळ्यांना विनंती करते की, तुमच्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळल्यास तुमची टेस्ट करून घ्या आणि सगळ्यांपासून काही दिवस वेगळे राहा.. सुजाण नागरिकाप्रमाणे स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घ्या... माझी तब्येत आता बरी असून केवळ मला थोडासा ताप आणि सर्दी आहे.

कनिकाने तिची ही इन्स्टाग्राम पोस्ट काही दिवसांपूर्वी डीलिट केली असून डीलिट करण्यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

Web Title: Kanika Kapoor Tests COVID-19 Positive for 5th Time PSC