नववर्षात कंगना करणार लग्न!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 11:47 IST2016-12-30T11:47:32+5:302016-12-30T11:47:32+5:30
हृतिक रोशनसोबतचे कथित अफेअर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वादामुळे चर्चेत असलेली कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय, तिच्या ...

नववर्षात कंगना करणार लग्न!!
ह तिक रोशनसोबतचे कथित अफेअर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वादामुळे चर्चेत असलेली कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय, तिच्या एका वक्तव्याने सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत. २०१७ मध्ये म्हणजेच येणाºया नववर्षात कंगना लग्न बंधनात अडकणार आहे. खुद्द कंगनानेच हा खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत कंगनाला नववर्षाचा प्लान विचारण्यात आला. नववर्षांना कंगनाच्या चाहत्यांना कंगनाकडून काय सरप्राईज मिळणार? असा प्रश्न तिला केला गेला. यावर कंगनाने जे उत्तर दिले ते ऐकून हा प्रश्न विचारणा-याचेही डोळे चमकले. मी लग्न करणार, असे कंगना म्हणाली.अर्थात तो नशीबवान कोण? या प्रश्नाचे उत्तर मात्र तिने चतुराईने टाळले. या प्रश्नावर ती नुसती हसली. तिच्या चेहºयावरील हे हास्य बघता तिच्या आयुष्यात नक्की कुणीतरी आहे, हे स्पष्ट आहे.
गतवर्षी कंगना आणि हृतिक रोशनचा वाद चांगलाच गाजला होता. एकमेकांना कायदेशीर नोटीस पाठविण्यापर्यंत गेलेल्या या वादाने संपूर्ण बॉलिवूड ढवळून निघाले होते. पण कंगना या वादात हृतिकला अगदी पुरून उरली. त्यापूर्वी आदित्य पांचोली आणि अध्ययन सुमन यांच्यासोबतही कंगना रिलेशनशिपमध्ये होती. याशिवाय युकेच्या एका डॉक्टरसोबतही कंगनाच्या अफेअरच्या वावड्या उठल्या होत्या. पण कंगनाचे यापैकी एकही रिलेशनशिप यशस्वी झाले नाही. पण कदाचित या सगळ्या अनुभवातून शिकत कंगनाने व्यक्तिगत आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता केवळ प्रतीक्षा आहे, ती कंगनाच्या आयुष्यातील नवा मिस्ट्री मॅन कोण? हे जाणून घेण्याची. व्यक्तिगत आयुष्यात बिनधास्त जगणारी कंगना लवकरच त्याचाही खुलासा करेलच. तोपर्यंत प्रतीक्षा आलीच!!