कंगना राणौतच्या आजोबांचे निधन, अभिनेत्री घरी पोहोचली पण ‘डॅडी’ तोपर्यंत जगात नव्हते...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 10:18 AM2020-12-15T10:18:05+5:302020-12-15T10:18:50+5:30

कंगनाने ट्वीटरवर दिली माहिती

Kangana Ranaut's grandfather passes away at 90 | कंगना राणौतच्या आजोबांचे निधन, अभिनेत्री घरी पोहोचली पण ‘डॅडी’ तोपर्यंत जगात नव्हते...

कंगना राणौतच्या आजोबांचे निधन, अभिनेत्री घरी पोहोचली पण ‘डॅडी’ तोपर्यंत जगात नव्हते...

googlenewsNext
ठळक मुद्देकंगना सध्या ‘थलायवा’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. या सिनेमात ती तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिचे आजोबा ब्रह्मचंद राणौत यांचे सोमवारी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. आजोबांचे निधन झाले त्यावेळी कंगना घरी नव्हती. तिने ट्वीटरवर ही माहिती दिली.
‘आज संध्याकाळी मी माझ्या मूळ गावी पोहोचली. कारण माझे आजोबा ब्रह्मचंद राणौत काही दिवसांपासून आजारी होते. मी घरी पोहोचेपर्यंत त्यांचे निधन झाले होते. ते 90 वर्षांचे होते. पण या वयातही त्यांचा सेन्स  ऑफ ह्युमर जबरदस्त होता. आम्ही सगळे त्यांना डॅडी म्हणायचो. ओम शांती...,’असे ट्वीट कंगनाने केले आहे.

कंगना सध्या ‘थलायवा’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. या सिनेमात ती तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. यानंतर धाकड आणि तेजस या दोन सिनेमातही कंगना दिसणार आहे.

  कंगना म्हणाली - छोट्याशा अफेअरसाठी किती रडणार?

अभिनेता हृतिक रोशनची एक केस सायबर सेलकडून आता क्राइम ब्रँच इंटेलिजन्ट यूनिटला ट्रान्सफर करण्यात आला आहे. क्राइम ब्रँचचे प्रभारी आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी याचे आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार हृतिक रोशनच्या एफआयआरवर तपास करण्यासाठी केस सायबर सेलकडून क्राइम ब्रँचच्या क्राइम इंटेलिजन्स यूनिटके देण्यात आली आहे.
हृतिक रोशनला 2013  ते 2014 दरम्यान100 ई-मेल आले होते. सांगितले होते की, ई-मेल अभिनेत्री कंगना रणौतच्या ई मेल आयडीवरून पाठवण्यात आले होते. याबाबत हृतिक रोशनने 2017 मध्ये सायबर सेलकडे एक तक्रार दिली होती. ई-मेल कंगनाच्या आयडीवरून आले होते. त्यावेळी कंगना म्हणाली होती की, तिचा ई-मेल आयडी हॅक झाला होता आणि तिने हृतिक रोशनला कोणताही ई-मेल केला नाही. याआधी 2016 मध्ये हृतिक रोशनने अज्ञात लोकांविरोधात तक्रार दाखल केली होती. 
या केसच्या घटनाक्रमावर अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. ‘त्याची कहाणी पुन्हा सुरू झाली. आमच्या ब्रेकअप आणि त्याच्या घटस्फोटाला इतके वर्षे होऊन गेले आहे. पण तो पुढे जाण्यास नकार देतोय. कोणत्याही महिलेला डेट करायला नकार देतो.  मी माझ्या पर्सनल लाइफमध्ये काही मिळवण्यासाठी पुढे येते तेव्हा तो पुन्हा तेच नाटक सुरू करतो. हृतिक रोशन कधीपर्यंत रडशील एका छोट्याशा अफेअरसाठी, असे कंगनाने म्हटले आहे.

Web Title: Kangana Ranaut's grandfather passes away at 90

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.