"मोदींना पनौती म्हणणाऱ्यांनो, त्यांनी स्पर्श केलेली गोष्ट...", कंगनाने ट्रोलर्सवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 01:52 PM2023-11-23T13:52:40+5:302023-11-23T13:53:10+5:30

ट्रोलर्सवर भडकली कंगना रणौत, म्हणाली, "त्यांच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था..."

kangana ranaut slams trollers for calling pm panauti said narendra modi is rare poltician | "मोदींना पनौती म्हणणाऱ्यांनो, त्यांनी स्पर्श केलेली गोष्ट...", कंगनाने ट्रोलर्सवर साधला निशाणा

"मोदींना पनौती म्हणणाऱ्यांनो, त्यांनी स्पर्श केलेली गोष्ट...", कंगनाने ट्रोलर्सवर साधला निशाणा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत अभिनयाबरोबरच्या तिच्या बेधडक स्वभावासाठीदेखील ओळखली जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना अनेक गोष्टींबाबत व्यक्त होताना दिसते. अनेकदा कंगनाच्या वक्तव्यांमुळे वादही निर्माण झाले आहेत. सध्या कंगनाच्या इन्स्टाग्राम पोस्टची चर्चा रंगली आहे. कंगनाने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला सुनावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रोल करणाऱ्यांवर कंगना भडकली आहे. 

कंगानाने इन्स्टा स्टोरीमध्ये "पंतप्रधानांना पनौती म्हणणाऱ्यांनो त्यांच्याबद्दल काही गोष्टी सांगू इच्छिते. आयुष्यात एकही निवडणूक न हरलेल्या काही राजकीय नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी स्पर्श केलेली गोष्ट सोनं होते. त्यांच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये गुजरात हे सर्वाधिक वेगाने प्रगती करणारं राज्य होतं. आणि आता भारताची अर्थव्यवस्था ४ ट्रिलियनपर्यंत पोहोचली आहे. राजकारणात तर्कहीन आणि अपायकारक व्यक्तींना जागा दिली नाही गेली पाहिजे," असं म्हटलं आहे. कंगनाची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. 

दरम्यान, कंगनाच्या तिच्या आगामी 'एमर्जन्सी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. अलिकडेच कंगनाचे 'तेजस', 'धाकड' आणि 'चंद्रमुखी २' हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. पण, हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. 

Web Title: kangana ranaut slams trollers for calling pm panauti said narendra modi is rare poltician

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.