गुडन्यूज! लवकरच आत्या होणार आहे कंगना राणौत, वहिनीच्या डोहाळे जेवणाचे सुंदर फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 10:56 AM2023-07-24T10:56:49+5:302023-07-24T11:00:30+5:30

कंगनाच्या घरी वहिनीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. 

Kangana ranaut sister in law ritu ranaut baby shower ceremony see inside photos | गुडन्यूज! लवकरच आत्या होणार आहे कंगना राणौत, वहिनीच्या डोहाळे जेवणाचे सुंदर फोटो आले समोर

गुडन्यूज! लवकरच आत्या होणार आहे कंगना राणौत, वहिनीच्या डोहाळे जेवणाचे सुंदर फोटो आले समोर

googlenewsNext

बॉलिवूड स्टार कंगना राणौत लवकरच आत्या होणार आहे. अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. अभिनेत्री कंगना राणौतने इन्स्टाग्रामवर वहिनी रितूच्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.
कंगना तिची वहिनी लवकरच आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिलीय. अभिनेत्रीच्या घरी वहिनीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. 

अभिनेत्री कंगना रणौतने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीने सांगितले की ती लवकरच आत्या होणार आहे. कंगनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये नणंद भावज यांच्या मधील बॉन्डिंगनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  

कंगना राणौतचा भाऊ अक्षत लग्नाच्या अडीच वर्षानंतर वडील होणार आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये त्याने रितूशी लग्न केले.  कंगना राणौतच्या पोस्टवर सेलिब्रिटींसोबतच चाहतेही अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. अनुपम खेर लिहितात, 'अभिनंदन. ' कंगना राणौत गुलाबी रंगाच्या साडी, केसात माळलेला गजरा अन् गळ्यात हेवी नेकलेस यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. कुटुंबीयांना भेटल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. वहिनी रितूच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा ग्लो स्पष्टपणे जाणवतोय.  याशिवाय आजी होणार असल्याचा आनंद कंगनाच्या आईच्या चेहऱ्यावर दिसतोय.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर कंगना तिचा आगामी सिनेमा 'तेजस'ला घेऊन चर्चेत आहे. यात ती वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'तेजस' हा सिनेमा वायुसेनेची वैमानिक तेजस गिलवर आधारित आहे. जिम्मा सर्वेश मेवाडा यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'तेजस' २० ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
 

Web Title: Kangana ranaut sister in law ritu ranaut baby shower ceremony see inside photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.