कंगनाचा 'तेजस' फ्लॉप, प्रकाश राज यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, "भारत २०१४ मध्येच..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 05:41 PM2023-10-29T17:41:46+5:302023-10-29T17:42:32+5:30

प्रकाश राज आणि कंगनामध्ये आता सोशल मीडियावर वॉर सुरु झाल्याचीच चिन्ह आहेत.

kangana ranaut shared video of her pleading audience to watch her tejas movie whereas prakash raj made fun of her | कंगनाचा 'तेजस' फ्लॉप, प्रकाश राज यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, "भारत २०१४ मध्येच..."

कंगनाचा 'तेजस' फ्लॉप, प्रकाश राज यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, "भारत २०१४ मध्येच..."

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचा (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये तिने महिला वैमानिकाची भूमिका साकारली आहे. सिनेमा बॉक्सऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही. खराब स्टोरी, दिग्दर्शन यामुळे प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवली आहे. दरम्यान कंगनाने व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याची विनंती केली आहे. तर प्रकाश राज (Prakash raj) यांनी कंगनाचा व्हिडिओ शेअर करत खिल्ली उडवली आहे.

कंगनाने व्हिडिओ शेअर करत म्हटले,'मित्रांनो माझा सिनेमा तेजस रिलीज झाला आहे. ज्यांनी सिनेमा बघितला ते कौतुक करत आहेत,, आशिर्वाद देत आहेत. पण मित्रांनो कोरोनानंतर हिंदी फिल्म इंडस्ट्री अद्याप सावरलेली नाही.99 टक्के सिनेमांना प्रेक्षक संधी देत नाहीत. मला माहित आहे की आजकाल सगळ्यांकडे मोबाईल फोन आणि घरात टीव्ही आहेत, पण तुम्ही सिनेमागृहात जाऊन कुटुंब, मित्रमंडळींसोबत सिनेमाचा आनंद घ्या. जर तुम्हाला उरी, मेरी कोम, नीरजा हे चित्रपट आवडले तर तेजसही नक्कीच आवडेल.'

कंगनाचा हा व्हिडिओ प्रकाश राज यांनी शेअर करत ट्वीट केले,'भारताला नुकतंच 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं आहे. जरा धीर धरा...तुमचा सिनेमाही चालेल.'

प्रकाश राज आणि कंगनामध्ये आता सोशल मीडियावर वॉर सुरु झाल्याचीच चिन्ह आहेत. दरम्यान कंगनाचा आगामी 'इमर्जन्सी' सिनेमा रिलीज होणार आहे ज्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यामध्ये कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे.

Web Title: kangana ranaut shared video of her pleading audience to watch her tejas movie whereas prakash raj made fun of her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.