'पंगा क्वीन' कंगना रणौतनं विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचं का केलं कौतुक?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 03:09 PM2024-02-14T15:09:03+5:302024-02-14T15:10:02+5:30

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी कंगना अनेक गोष्टींवर आपले मत मांडताना दिसते.  

Kangana Ranaut Praises Aishwarya Rai Bachchan divine Beauty Share Appreciation post On Her | 'पंगा क्वीन' कंगना रणौतनं विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचं का केलं कौतुक?

'पंगा क्वीन' कंगना रणौतनं विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचं का केलं कौतुक?

बॉलिवूडची क्वीन अशी ओळख असलेली अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी कंगना अनेक गोष्टींवर आपले मत मांडताना दिसते.  पण, क्वचितच कंगना कोणाची प्रशंसा करताना दिसली असेल. बेधडक आणि स्पष्टवक्ती असलेली कंगना सहजा-सहजी  कुणाचं कौतुक करत नाही. पण यावेळी कंगनाने  विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचं मनापासून कौतुक केलं आहे. 

कंगना रणौतने 'हम दिल दे चुके सनम'मधील ऐश्वर्याच्या काही क्लिप शेअर केल्या आहेत. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'ऐश्वर्याच्या दैवी सौंदर्यासाठी एक अप्रिशिएशन पोस्ट'.  फिल्म इंडस्ट्रीवर टीका करणाऱ्या कंगनानं ऐश्वर्याचं अचानक कसे काय कौतुक केलं, असे म्हणत चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कंगनाने ऐश्वर्याच्या सौंदर्याचं कौतुक करण्याच्या ही पहिलीच वेळ नाही. याआधीही कंगनाने  विश्वसुंदरीचं कौतुक केले आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्ल बोलायचे झाल्यास, अलिकडेच तिचा ‘तेजस’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात कंगना 'पायलट'च्या भूमिकेत पाहायला मिळाली. लवकरच ती आता 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ती स्वतः करत आहे. यात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. तर ऐश्वर्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची मणिरत्नमच्या 'पोनियिन सेल्वन 2' मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. सध्या तिच्या नवीन प्रोजेक्ट्सबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Web Title: Kangana Ranaut Praises Aishwarya Rai Bachchan divine Beauty Share Appreciation post On Her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.