'मी तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इथे बसले नाही', दीपिका पादुकोणबाबत प्रश्न विचारताच कंगना भडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 13:04 IST2022-02-04T12:59:16+5:302022-02-04T13:04:41+5:30
पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने कंगनाला दीपिका पादुकोण(Deepika Padukone)बाबत प्रश्न विचारला..

'मी तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इथे बसले नाही', दीपिका पादुकोणबाबत प्रश्न विचारताच कंगना भडकली
कंगना रणौत(Kangana Ranaut)ने गुरुवारी एकता कपूरच्या आगामी रिअॅलिटी शो 'लॉकअप'चे प्रमोशन केलं. कंगना या शोची होस्ट आहे. पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने कंगनाला दीपिका पादुकोण(Deepika Padukone)च्या नुकत्याच झालेल्या वादाबद्दल विचारले, ज्यात सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने तिच्या शॉर्ट ड्रेसची खिल्ली उडवली. यावर कंगनाने रिपोर्टरला असे उत्तर दिले की तिथे बसलेले लोक बघतच राहिले.
खरं तर, कंगनाला विचारण्यात आले की दीपिका पादुकोणसारख्या महिलेला तिच्या पोशाखाबद्दल ट्रोल केले जाते, याचा महिला सशक्तीकरणावर कसा परिणाम होतो. यावर कंगना म्हणाली, 'मी इथं त्याच्याबाजूने बोलायला आहे जे लोक आवाज उठवू शकत नाहीत.'
कंगना राणौत पुढे म्हणते, 'दीपिका पादुकोणचा स्वतःचा आवाज, तिच्याकडे प्लॅटफॉर्म आणि फॅन फॉलोइंग आहे. ती स्वतःचा बचाव करू शकते. मी इथे तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करायला बसलेले नाही.कंगनाच्या या वक्तव्यावर सोशल मीडिया यूजर्सच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.
छोट्या ड्रेसमुळे ट्रोल झाली
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फ्रेडी बर्डीने 'दीपिका'बद्दल एक कमेंट केली होती. फ्रेडीने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, 'बॉलिवुडचा न्यूटन नियम, जसजशी 'गहराइयां'ची रिलीज डेट जवळ येत जाईल तसे कपडे लहान होतील. दीपिकाने यावर प्रतिक्रिया देत म्हणाली होती - 'वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की विश्व हे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनपासून बनले आहे... पण ते मूर्खांबद्दल सांगायला विसरले.'