अखेर कंगना राणौतची ‘टिवटिव’ थांबणार! ट्विटरला रामराम ठोकत ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार शिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 05:33 PM2021-02-10T17:33:07+5:302021-02-10T17:34:10+5:30

ट्विटर आता तुझी वेळ संपली आहे, म्हणत स्वत: दिली माहिती; या स्वदेशी अ‍ॅपवर उघडणार अकाऊंट

kangana ranaut is leaving twitter will make her new account on koo app soon | अखेर कंगना राणौतची ‘टिवटिव’ थांबणार! ट्विटरला रामराम ठोकत ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार शिफ्ट

अखेर कंगना राणौतची ‘टिवटिव’ थांबणार! ट्विटरला रामराम ठोकत ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार शिफ्ट

googlenewsNext
ठळक मुद्देकंगनाचे ट्विटरवर 30 लाखांवर फॉलोअर्स आहेत. कंगनाने ट्विटरला रामराम ठोकण्याच्या निर्णयामुळे या फॉलोअर्सची निराशा होणार आहे.

असा एकही मुद्दा नाही, ज्यावर कंगना राणौत बोलत नाही. माध्यम कोणते तर ट्विटर. तिची टिवटिव सारखी, सतत सुरु असते. गेल्या काही महिन्यांत तर कंगना ट्विटरवर दिवसरात्र व्यक्त होत होती. सोबत ट्रोलही होत होती.  सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर कंगना तर कंगनाचे प्रत्येक ट्विट चर्चेत होते.  महाराष्ट्र सरकारसोबतचा तिचा पंगा, बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण,   आणि आता शेतकरी आंदोलनावर ती ट्विटरच्या माध्यमातूनच व्यक्त झाली. यादरम्यान तिच्या अनेक ट्विटनी वादही ओढवून घेतले. आता मात्र कंगनाची टिवटिव थांबणार आहे. होय,    ट्विटरवर व्यक्त होणारी कंगना आता ट्विटरला रामराम ठोकणार आहे.  ट्विटरवरूनच खुद्द तिनेही ही माहिती दिली आहे. 

‘ट्विटर आता तुझी वेळ संपली आहे. आता Koo App वर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. मी लवकरच माझे अकाउंट डिटेल्स शेअर करेन. स्वदेशी #kooapp चा अनुभव घेण्यासाठी खूपच उत्सुक आहे,’ असे ट्विट तिने केले.

कंगनाचे ट्विटरवर 30 लाखांवर फॉलोअर्स आहेत. कंगनाने ट्विटरला रामराम ठोकण्याच्या निर्णयामुळे या फॉलोअर्सची निराशा होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच शेतकरी आंदोलनावरील कंगनाच्या बेताल ट्विटवर ट्विटरने कारवाई केली होती. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी व पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत ट्विट केले होते. तिच्या या ट्विटला विरोध करत कंगनाने ट्विटचा भडीमार केला होता. थेट आंदोलनकर्त्या शेतकºयांना दहशतवादी म्हटले होते. यानंतर ट्विटरने कारवाई करत तिचे काही वादग्रस्त ट्विट डिलीट केले होते. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे कारण ट्विटरने दिले होते.

काय आहे kooapp?


ही ट्विटरसारखीच एक अ‍ॅप आहे. 10 महिन्यांपूर्वीच ही अ‍ॅप लॉन्च झाली होती. या अ‍ॅपला आत्मनिर्भर अ‍ॅप चॅलेंजचा अवार्डही मिळाला आहे. ही अ‍ॅप  Aprameya Radhakrishna आणि  Mayank Bidwatka  यांनी विकसीत केली आहे. हिंदी, तेलगू, कन्नड, बंगाली, तामिळ, मल्याळम, गुजराती, पंजाबी, ओडिशी, आसामी अशा अनेक भाषेत ही अ‍ॅप लॉन्च करण्यात आली आहे. गुगल प्लेस्टोरवर या अ‍ॅपला ‘बिल्ट फॉर इंडियन्स’ म्हटले गेले आहे. कनेक्ट विद इंडियन्स इन इंडियन लँग्वेज, अशी या अ‍ॅपची टॅगलाईन आहे. 
 

Web Title: kangana ranaut is leaving twitter will make her new account on koo app soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.