"हीच आहे सोशल मीडियाची खरी ताकद", कंगणाने घेतली ट्विटरवर दणक्यात एंट्री, सुरू केले स्वतःचे अकाऊंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 14:07 IST2020-08-21T14:07:13+5:302020-08-21T14:07:59+5:30
सोशल मीडियामुळेच आज प्रत्येक व्यक्ती आवाज उठवू लागला आहे. हे खूप साकारात्मक ऊर्जा देणारे असल्याचेही कंगणा राणौतने म्हटले आहे.

"हीच आहे सोशल मीडियाची खरी ताकद", कंगणाने घेतली ट्विटरवर दणक्यात एंट्री, सुरू केले स्वतःचे अकाऊंट
कंगणा राणौत सोशल मीडियावर स्वतःकधी सक्रीय नव्हती. कंगाचे सगळे विचार, मतं टीम कंगना रणौत या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून जनतेसमोर यायचे. मात्र आता सोशल मीडिया वापराबाबतही आपलं ठाम मत माडंत तिने टीम कंगणा राणौत व्यतिरिक्त स्वतःचं ट्विटर अकाऊंट सुरू करत ट्विटरवर दणक्यात एंट्री घेतली आहे. सध्याचा काळ सोशल मीडियाचा आहे, त्यामुळे सोशल मीडियाला वगळून चालणार नाही आणि हीच सोशल मीडियाची ताकद सुशांतच्या मृत्युनंतर पाहायला मिळाली. पहिल्यांदाच कोण्या एका कलाकाराच्या मृत्युवर जनेतेने एजकुट होवून इतक्या मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला आहे. सोशल मीडियामुळे जगाच्या कानोकप-यातून यावर बोलले जात आहे. यापूर्वीही अशा घटना घडायच्या, लोकं बोलायचीही पण आपली मतं आणि विचार पोहचण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सशक्त असे माध्यम नव्हते.
सोशल मीडियामुळेच आज प्रत्येक व्यक्ती आवाज उठवू लागला आहे. हे खूप साकारात्मक ऊर्जा देणारे असल्याचेही तिने म्हटले आहे. आपण एकत्र येऊन लढा दिल्याने सगळे काही शक्य आहे हेच सोशल मीडियाने दाखवून दिले आहे. म्हणूनच तिने ट्विटरवर पदार्पण केल्याचं म्हटलं आहे.
This is for my twitter family 🥰🙏 pic.twitter.com/KGdJPPWrQ1
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 21, 2020
मी कधीच इतरांप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय नव्हती. कधीच चाहत्यांशी संवाद साधला नाही. कारण सिनेमातून मी माझे विचार लोकांपर्यंत पोहचवले असल्याचे मला नेहमी वाटायचे. मात्र काळ बदललाय त्यानुसार बदलावे लागेल. कामा व्यतिरिक्तही आपण सोशल मीडियाचा योग्य वापर करू शकतो. म्हणूनच मला सोशल मीडियाची आज किंमत कळलीय. आज सोशल मीडियापेक्षा अधिक कोणतेही प्रभावी माध्यम नाही. म्हणूनच आजपासून मी थेट ट्विटरवर उपलब्ध राहणार असल्याचे तिने म्हटले आहे.