Video: कंगनाने प्रचारादरम्यान अमिताभ यांच्यासोबत केली स्वतःची तुलना, म्हणाली - "मला इतका सन्मान.."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 10:11 AM2024-05-06T10:11:07+5:302024-05-06T10:11:48+5:30

कंगना रणौतने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्वतःची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी केलीय. त्यामुळे लोकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केलीय (kangana ranaut, amitabh bachchan)

Kangana ranaut compared herself with Amitabh bachchan during the campaign | Video: कंगनाने प्रचारादरम्यान अमिताभ यांच्यासोबत केली स्वतःची तुलना, म्हणाली - "मला इतका सन्मान.."

Video: कंगनाने प्रचारादरम्यान अमिताभ यांच्यासोबत केली स्वतःची तुलना, म्हणाली - "मला इतका सन्मान.."

अभिनेत्री कंगना रणौत सध्या चांगलीच चर्चेत आहे. कंगना हिमाचल प्रदेशातीलमंडी विभागातून लोकसभा निवडणुकीची उमेदवार आहे. कंगना तिच्या प्रचारासाठी सध्या विविध ठिकाणी फिरत आहे. अशातच एका सभेत कंगनाने बोलता बोलता स्वतःची तुलना थेट अमिताभ बच्चन यांच्याशी केलीय. त्यामुळे कंगनाला लोकांच्या बऱ्या वाईट प्रतिक्रियांचा सामना करावा लागत आहे. कंगना सभेत असं नेमकं काय म्हणाली.?

कंगनाने अमिताभ बच्चन यांच्याशी केली स्वतःची तुलना 

कंगनाचा एका सभेतील व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत कंगना म्हणतेय की, "सध्या संपूर्ण देश चिंतेत आहे. मी तुमची कंगना प्रचारासाठी राजस्थानला जाते, पश्चिम  बंगालला जाते, मी दिल्लीला जाते अथवा  मणिपूरला... मला लोकांकडून खूप प्रेम आणि आदर मिळतोय. मी खात्रीने सांगू शकते की अमिताभ बच्चन यांच्यानंतर इंडस्ट्रीत कोणाला इतकं प्रेम आणि आदर मिळत असेल तर तो मला मिळतोय."

कंगनावर लोकांची नाराजी

कंगनाने हे विधान केल्याने अनेकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केलीय. कंगनाने स्वतःची तुलना बिग बींशी केल्याची गोष्ट अनेकांना खटकली आहे. त्यामुळे कमेंटच्या माध्यमातून कंगनावर लोकांनी टीका केलीय. दरम्यान कंगना रणौत यंदाच्या लोकसभा निवडणुकीला भारतीय जनता पार्टीची उमेदवार म्हणून उभी आहे. हिमाचल प्रदेशातीलमंडी विभागात कंगना भाजपाची उमेदवार आहे. कंगना तिच्या प्रचारासाठी विविध ठिकाणी फिरत आहे.

Web Title: Kangana ranaut compared herself with Amitabh bachchan during the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.