रियल लाइफमध्येही 'क्वीन' आहे कंगना राणौत, इतक्या कोटींची आहे तिची संपत्ती

By सुवर्णा जैन | Published: September 21, 2020 01:00 PM2020-09-21T13:00:50+5:302020-09-21T13:01:50+5:30

आपल्या स्टाईल, फॅशनबाबत ती बरीच सजग असते आज  बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी आणि महागडी अभिनेत्री म्हणून कंगणाचे नाव आघाडीवर असते. 

Kangana Ranaut Is Bollywood's Most Expensive Actress,Now owener of Crores of Property | रियल लाइफमध्येही 'क्वीन' आहे कंगना राणौत, इतक्या कोटींची आहे तिची संपत्ती

रियल लाइफमध्येही 'क्वीन' आहे कंगना राणौत, इतक्या कोटींची आहे तिची संपत्ती

googlenewsNext

बॉलीवुडची क्वीन म्हणजे कंगना राणौत गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये सुरूअसणा-या घराणेशाही, गटबाजी यावर परखड मत मांडत ती चर्चेत आहे. बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे कंगणाच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगत असते. रिल लाइफमध्ये ज्यारितीने सुंदर दिसतो तितकेच सुंदर आणि लक्षवेधी रिअल लाइफमध्येही दिसावं असा खटाटोप कंगनाचा असतो. त्यामुळे आपल्या स्टाईल, फॅशनबाबत ती बरीच सजग असते आज  बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी आणि महागडी अभिनेत्री म्हणून कंगनाचे नाव आघाडीवर असते. 

कंगनाने बॉलिवूडमध्ये स्वबळावरस्वतःटे प्रस्थ निर्माण केले आहे. आज  ती कोणत्याही कामासाठी कोणावरही अवलंबून नाही. तिचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस आहे त्याच अंतर्गत ती सिनेमांची निर्मिती करते. कंगना आज  96 कोटींपेक्षा जास्त संपत्तीची मालकीण आहे. तिच्याकडे तीन फ्लॅट आणि दोन महागड्या कारचा समावेश आहे. याशिवाय मनालीमध्ये तिचा आलिशान असा बंगला आहे. 8 बेडरूमचा हा बंगला कंगनाने 2018 मध्ये 10 कोटींमध्ये खरेदी केला होता. सिनेमा आणि ब्रँड एंडोर्समेंट हेच तिच्या कमाईचे मुख्य साधन आहे. 


बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री आहे कंगना राणौत !

चित्रपटात काम करण्यासाठी कंगना आतापर्यंत 17-18 कोटी रुपये मानधन घेत होती. मात्र तिने तिचे मानधनही वाढवले आहे. व्यापार विश्लेषक अतुल मोहन यांच्या माहितीनुसार,  'धाकड' या आगामी चित्रपटासाठी  सुमारे 21 कोटी रुपये मानधन तिने घेतले आहे.  'जयललिता' यांचा बायोपिक ‘थलायवी’साठी सुमारे 21-22 कोटी रुपये मानधन तिला देण्यात आले आहे. त्यानुसार कंगनानंतर बॉलिवूडमध्ये दीपिका पदुकोणचा बॉलिवूडच्या सर्वात महागडी अभिनेत्रींमध्ये दुसरा क्रमांक लागतो.

रिअल लाइफमध्येही सुंदर दिसावं यासाठी कंगणाचा असतो खटाटोप
 
'क्वीन' या सिनेमातील कंगनाची भूमिका रसिकांना भावली होती. त्यामुळे आपल्या स्टाईल, फॅशनबाबत ती बरीच सजग असते. कधी कधी दिवसातून होणा-या तीन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये कंगना 3 विविध पद्धतीच्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये अवतरते. कंगनाने आपल्या स्टाईलच्या माध्यमातून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न कायमच केला आहे. त्यामुळे ड्रेसिंग स्टाईलसह शूज, बॅग, गॉगल यामध्येही विविध प्रकारचे नवनवे ब्रँड्स कंगनाकडे पाहायला मिळतात. त्यामुळे रिल लाइफमध्ये फॅशनिस्ट असणारी कंगना रिअल लाइफमध्येही सुंदर दिसण्यासाठी तितकाच तामझाम करते. रसिकांनी प्रेमाने दिलेले बॉलीवुडची 'क्वीन' हे नाव सार्थ ठरवण्याचा बहुदा कंगनाचा हा प्रयत्न असावा नाही का ?

Web Title: Kangana Ranaut Is Bollywood's Most Expensive Actress,Now owener of Crores of Property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.