कमल हसन यांना दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 14:00 IST2016-07-14T05:49:12+5:302016-07-14T14:00:34+5:30

अभिनेता कमल हसन यांचा पाय फ्रँक्चर झालाय. चेन्नई येथील त्यांच्या ऑफिसच्या जिन्यावरून घसरून पडल्याने त्यांचा पाय  फ्रॅक्चर झाल्याचं कळतंय. ...

Kamal Hassan injuries | कमल हसन यांना दुखापत

कमल हसन यांना दुखापत

िनेता कमल हसन यांचा पाय फ्रँक्चर झालाय. चेन्नई येथील त्यांच्या ऑफिसच्या जिन्यावरून घसरून पडल्याने त्यांचा पाय  फ्रॅक्चर झाल्याचं कळतंय. लॅास एंजिल्समध्ये ते 'सबाश नायडू' त्यांच्या आगामी सिनेमाचं शुटींग पूर्ण करून ते नुकतेच त्यांच्या घरी आले होते.मात्र अचानक जीन्यावरून घसरून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यांना चेन्नईच्या अपोलो हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आलय. ही गंभीर दुखापत नसून काळजी करण्यासारखं कारण जरी नसलं तरी  पूर्ण पणे त्यांची जखम भरत नाही तोपर्यंत  त्यांना काही दिवस तरी आराम करण्याची गरज असल्याचं डॅाक्टरांनी सांगितलंय.त्यामुळे आता त्यांच्या आगामी सिनेमाचं पुढचं शेड्युअल हैदराबाद  करणार असल्याचं कळतंय.मात्र जेव्हा कमल हसन यांना पुर्णपणे बरं वाटेल तेव्हाचं या सिनेमाचं शुटींग पूर्ण होणार अल्यांच सुत्रांनी सांगितलंय.   

Web Title: Kamal Hassan injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.