लग्नाआधीच आई बनली 'ही' अभिनेत्री, गोंडस कन्येला दिला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 10:17 IST2020-02-09T10:16:51+5:302020-02-09T10:17:40+5:30

ती लग्नाआधीच आई होणार म्हटल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

kalki koechlin blessed with a baby girl before marriage | लग्नाआधीच आई बनली 'ही' अभिनेत्री, गोंडस कन्येला दिला जन्म

लग्नाआधीच आई बनली 'ही' अभिनेत्री, गोंडस कन्येला दिला जन्म

ठळक मुद्दे2009 मध्ये ‘देव डी’ या चित्रपटाच्या सेटवर कल्की  दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती.

आपल्या अदाकारीने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री कल्की कोच्लिन आई बनली आहे. काल रात्री तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
कल्कीने लग्नाआधीच मुलीला जन्म दिला आहे. 2019 मध्ये कल्कीने ती प्रेग्नंस असल्याची घोषणा केली होती. कल्की लग्नाआधीच आई होणार म्हटल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

दीर्घकाळापासून कल्की इस्रायली पियानोवादक गाय हर्शबर्गला डेट करतेय.  दोघांनी अद्याप लग्न केलेले नाही.  


कल्की केवळ एक गुणी अभिनेत्रीच नाही तर एक लेखिका सुद्धा आहे. फ्रेंच वडील आणि भारतीय आई लाभलेल्या कल्कीचे आजोबा मॉरिस कोल्चिन हे आयफेल टॉवर आणि स्टॅच्यू ऑफ लिबटीर्चे चीफ इंजिनिअर होते.कल्कीला फ्रेंचशिवाय हिंदी, इंग्लिश आणि तामिळ भाषा येतात. ‘देव डी’साठी कल्कीला बेस्ट सपोर्टीं अक्ट्रेसचा फिल्मफेअर अवार्ड मिळाला. यानंतर ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’,‘ये जवानी है दीवानी’,‘माय फ्रेंड पिंटो’,‘शैतान’,‘शंघाई’ अशा अनेक चित्रपटांत झळकली आहे.

2009 मध्ये ‘देव डी’ या चित्रपटाच्या सेटवर कल्की  दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. 2015 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला. पण घटस्फोटानंतरही आजही कल्की व अनुराग कश्यप एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 

Web Title: kalki koechlin blessed with a baby girl before marriage