लग्न न करताच आई झाली 'ही' अभिनेत्री, म्हणाली, 'पहिल्या घटस्फोटानंतर मी...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 13:32 IST2023-08-02T13:31:45+5:302023-08-02T13:32:25+5:30
नुकतीच अभिनेत्री गोव्यात स्थायिक झाली आहे

लग्न न करताच आई झाली 'ही' अभिनेत्री, म्हणाली, 'पहिल्या घटस्फोटानंतर मी...'
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्री कल्की कोचलीन (Kalki Koechlin) सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. तिची 'मेड इन हेव्हन 2' ही सिरीज येत आहे. सिरीजनिमित्ताने तिने एक मुलाखतही दिली. यामध्ये तिने घटस्फोट, लग्न न करतात आई होणं या सर्व गोष्टींवर चर्चा केली . तसंच नुकतंच तिने लग्न न करण्याचा निर्णय का घेतला याचं कारणही सांगितलं. यावरुन तिला ट्रोलही केलं गेलं आहे.
मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत कल्की म्हणाली, 'माझं पहिलं लग्न दिग्दर्शक अनुराग कश्यपशी झालं होतं. पण माझ्या पार्टनरला लग्नात काहीच इंटरेस्ट नाही. मी आधीच घटस्फोटीत असल्याने मला पुन्हा लग्न करण्याची आता इच्छा नाही. म्हणूनच आम्ही एकत्र राहत असलो तरी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.'
गोव्यात स्थायिक होण्याचं कारण सांगितलं
कल्की आपल्या पार्टनरसोबत गोवा येथे स्थायिक झाली आहे. प्रोजेक्ट्ससाठी फक्त ती मुंबईत येते. कल्की म्हणाली, 'मला असं वाटतं की माझ्या मुलीचं बालपण निसर्गाच्या सान्निध्यात जावं. म्हणून आम्ही गोवा येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मी माझा पार्टनर हर्सबर्गला इस्राईल टूरवेळी भेटले होते. कल्की सध्या फरहान अख्तरच्या 'मेड इन हेव्हन 2' वेबसिरीजचे प्रमोशन करत आहे. याशिवाय ती दीप्ती नवलसोबत 'गोल्डफिश' मध्ये दिसणार आहे.