Teaser Out : कलंक नहीं ये इश्क है...! सोशल मीडियावर ‘कलंक’च्या टीजरची धूम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 13:47 IST2019-03-12T13:42:16+5:302019-03-12T13:47:51+5:30

वरूण धवन, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर अशा दिग्गजांच्या भूमिकेने सजलेल्या ‘कलंक’ या चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असतांनाच आज या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला.

kalank teaser out varun dhawan alia bhatt sanjay dutt madhuri dixit sonakshi film teaser shocked audience | Teaser Out : कलंक नहीं ये इश्क है...! सोशल मीडियावर ‘कलंक’च्या टीजरची धूम!!

Teaser Out : कलंक नहीं ये इश्क है...! सोशल मीडियावर ‘कलंक’च्या टीजरची धूम!!

ठळक मुद्दे‘कलंक’ हा सिनेमा येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

मल्टीस्टारर ‘कलंक’ या आगामी चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय आणि  सोशल मीडियावर धूम करतोय. वरूण धवन, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर अशा दिग्गजांच्या भूमिकेने सजलेल्या या चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असतांनाच आज या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला. २ मिनिट ५ सेकंदांच्या या टीजरमध्ये चित्रपटाच्या सर्व पात्रांची झलक पाहायला मिळते. टीजर बघता, या चित्रपटात प्रेम आणि धोक्याची कथा असल्यो भासते. ‘कुछ रिश्ते कर्जों की तरह होते है, उन्हे निभाना नहीं चुकाना पडता है,’ असा वरूणच्या तोंडचा टीजरमधील एक संवाद मनाला भिडतो. ‘जब किसी की बर्बादी हमें अपनी जीत जैसी लगे तो समझ लीजीए इस दुनिया में हमसे बर्बाद कोई नहीं है,’ हा आलियाचा तोंडचा संवादही लक्षवेधी ठरतो.

टीजर पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा... bit.ly/KalankTeaser 


टीजरमधील भव्य सेट्स लक्ष वेधून घेतात. टीजरच्या शेवटच्या सीनमध्ये रावणाचा वध होतो आणि आलिया व वरूण एकमेकांना भेटतात, असे दाखवण्यात आले आहे. तूर्तास ‘कलंक’चा हा टीजर सोशल मीडियावर तुफान हिट ठरला आहे. या चित्रपटाचे पोस्टर्स पाहून आधीच प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. टीजर पाहून ही उत्कंठा आणखी शिगेला पोहोचली आहे. तेव्हा तुम्हीही हा टीजर पाहा आणि कसा वाटला ते नक्की कळवा.
‘कलंक’ हा सिनेमा येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

Web Title: kalank teaser out varun dhawan alia bhatt sanjay dutt madhuri dixit sonakshi film teaser shocked audience