काजोल म्हणते, मी सुंदर दिसत नसेल तर अजय प्रशंसाच करीत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 17:24 IST2016-11-17T21:51:10+5:302016-11-18T17:24:33+5:30
बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही स्वत:ला सुंदर मानत नाही. काजोल म्हणते, जेव्हा अजय (देवगन) मला सजलेली पाहून त्याचे ठीक आहे ...

काजोल म्हणते, मी सुंदर दिसत नसेल तर अजय प्रशंसाच करीत नाही
एका कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काजोलने आपल्या खाजगी आयुष्यासह करिअरविषयी गप्पा मारल्या. ती म्हणाली, सिनेमात आल्यावर या गोष्टीवर विश्वासच होत नव्हता की मी सुंदर आहे. कधी कधी हे माझ्यासाठी अडचणीचे ठरत होते. अजय तुझी प्रशंसा करतो का? या प्रश्नावर काजोल म्हणाली, मी जोपर्यंत चांगली दिसत नाही तोपर्यंत तर अजय नोटीसही करीत नाही. जेव्हा मी खूप सजून असते तेव्हा त्याला विचारावे लागते. मी चांगली दिसत असेल तर तो ठीक आहे एवढेच म्हणतो. त्याचे ठीक आहे हे म्हणणे हीच माझ्यासाठी प्रसंशा आहे. मला माझी आई तनुजाप्रमाणे दिवसेंदिवस अधिक सुंदर दिसायचे आहे. माझ्या आईचे वय झाल्यावरही ती वयाने कमी दिसत होती. माझ्या मते हीच सुंदरता आहे.
आपल्या करिअर विषयी काजोल म्हणाली, आनंद गांधी यांच्या क थेवर आधारित एका चित्रपटात मी दिसणार आहे. अजय या चित्रपटाची निर्मिती करीत असून, यात माझी प्रमुख भूमिका असणार आहे. यात मी सिंगल मदरची भूमिका साकारत असून, लवकर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होते. लोक सिनेमाचे वर्गीकरण करतात, मात्र सिनेमा हे मनोरंजनाचे साधन असेल तर त्याचे वर्गीकरण करता येणार नाही असेही काजोलने सांगितले.