​काजोलने नाकारला ‘दबंग3’चा प्रस्ताव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 16:32 IST2016-08-17T11:01:49+5:302016-08-17T16:32:45+5:30

‘दबंग3’ बनण्याआधीच चर्चेत आहे. आधी  सलमानसोबतच्या भांडणामुळे ‘दबंग3’मधून  सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट झाल्याची बातमी आली. नंतर या चित्रपटात सोनाक्षीऐवजी ...

Kajol rejects Dabang3 proposal? | ​काजोलने नाकारला ‘दबंग3’चा प्रस्ताव?

​काजोलने नाकारला ‘दबंग3’चा प्रस्ताव?

बंग3’ बनण्याआधीच चर्चेत आहे. आधी  सलमानसोबतच्या भांडणामुळे ‘दबंग3’मधून  सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट झाल्याची बातमी आली. नंतर या चित्रपटात सोनाक्षीऐवजी परिणीती चोप्राची वर्णी लागणार असल्याची बातमी आली. अर्थात ही बातमी खुद्द परिणीतीनेच नाकारली आणि मग ‘दबंग3’मध्ये सोनाक्षीच असणार ही खबर कन्फर्म झाली. खरे तर सोनाक्षीचे नाव कन्फर्म झाल्यावर चर्चा थांबायला हवी होती. पण नाहीच.‘दबंग3’मध्ये केवळ सोनाक्षीच नाही तर आणखी एक हिरोईन असणार आणि तिची भूमिका सोनापेक्षाही अतिशय महत्त्वपूर्ण राहणार अशी नवी चर्चा कानावर आली. हे कळल्यामुळेच सोना नाराज असल्याची चर्चा पाठोपाठ बी-टाऊनमध्ये पसरली. आता ही दुसरी अभिनेत्री कोण, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. पण  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दबंग3’मधील या नकारात्मक भूमिकेसाठी काजोलला विचारणा झाली होती. खुद्द अरबाज खान ही आॅफर घेऊन काजोलकडे गेला होता. पण काजोलने ही भूमिका नाकारली. सूत्रांच्या मते, काजोलला सलमानच्या तोडीची भूमिका हवी होती. तसे नसल्याने तिने हा चित्रपट नाकारला. एका चित्रपटात दोन ‘खान’ असू शकत नाही, असे तिने अरबाजला सुनावल्याचेही कळते. आता ही बातमी किती खरी, किती खोटी हे तर आम्हाला ठाऊक नाही. कारण खुद्द अरबाजने ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. आता अरबाजनेच बातमी खोटी ठरवल्यावर खोटी तर खोटी! शेवटी त्याच्यावर काही तर विश्वास ठेवावा लागणारच ना!!

Web Title: Kajol rejects Dabang3 proposal?