एखाद्या गृहिणीप्रमाणेच आहे काजोलला या गोष्टीची आवड, वाचून पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 06:30 IST2020-03-04T06:30:00+5:302020-03-04T06:30:02+5:30

काजोलने ही गोष्ट नुकतीच द कपिल शर्मा शोमध्ये सांगितली.

Kajol likes to knit clothes for her family, revealed on The Kapil Sharma Show PSC | एखाद्या गृहिणीप्रमाणेच आहे काजोलला या गोष्टीची आवड, वाचून पडाल तिच्या प्रेमात

एखाद्या गृहिणीप्रमाणेच आहे काजोलला या गोष्टीची आवड, वाचून पडाल तिच्या प्रेमात

ठळक मुद्देकाजोलने सांगितले की, मला विणकाम करायला आवडते. माझी मुले न्यासा आणि युग लहान होती, तेव्हा मी त्यांच्यासाठी गोधडी आणि टी-शर्ट विणले होते. मी अजयसाठी सुद्धा दोन टी शर्ट विणले आहेत.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात द कपिल शर्मा शोमध्ये महिला दिन साजरा केला जाणार असून हिंदी तसेच विविध भाषेतील चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री द कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावणार आहेत. या सगळ्या अभिनेत्री देवी या लघुपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र येणार आहेत. 

देवी या लघुपटात काजोल, श्रुती हासन, नेहा धुपिया, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी, मुक्ता बर्वे, शिवानी रघुवंशी, संध्या म्हात्रे, रमा जोशी आणि यशस्विनी दयामा या नऊ अभिनेत्री आहेत. या सर्वांनी द कपिल शर्मा शो मध्ये उपस्थित राहून कपिल शर्माच्या टीमसोबत खूप सारी मजा मस्ती केली. तसेच या लघुपटाविषयी काही खास गोष्टी सांगितल्या. हा लघुपट केवळ दोन दिवसांत चित्रित करण्यात आलेला आहे. त्यात नऊ पीडित महिला आणि त्यांच्या कथा आहेत. 


 
द कपिल शर्मा शोमध्ये कपिल शर्माने काजोलला तिच्या अभिनयाव्यतिरिक्त इतर छंदांबद्दल विचारले. तेव्हा तिने सांगितले की, “मला विणकाम करायला आवडते. माझी मुले न्यासा आणि युग लहान होती, तेव्हा मी त्यांच्यासाठी गोधडी आणि टी-शर्ट विणले होते. मी अजयसाठी सुद्धा दोन टी शर्ट विणले आहेत तर तनिशासाठी लांब जॅकेट विणले आहे.” ती पुढे म्हणाली की, अजूनही जेव्हा मला मोकळा वेळ मिळतो, तेव्हा मला माझ्या जवळच्या माणसांसाठी विणकाम करायला आवडते. आपल्या माणसांसाठी कपडे विणण्यात मला खूप आनंद मिळतो.


 
या कार्यक्रमात पुढे कपिलने श्रुती हासनला हा तेरा मिनिटांचा लघुपट करण्यामागील कारण विचारले असता ती म्हणाली, “खरं तर मला ही पटकथा खूप आवडली. त्यामुळे फिल्म किती लांबीची आहे याचा विचार करण्यापेक्षा त्याची कथा आणि माझ्या भूमिकेबद्दल विचार करणे मला जास्त महत्त्वाचे वाटले. ही फिल्म एकाच लोकेशनवर या सगळ्या सुंदर अभिनेत्रींसह शूट झाली आहे.”

Web Title: Kajol likes to knit clothes for her family, revealed on The Kapil Sharma Show PSC