काजोलला एचडीएफसी बँकेकडून दर महिन्याला मिळणार ६ लाख ९० हजार, काय आहे कारण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:36 IST2025-11-20T12:34:24+5:302025-11-20T12:36:00+5:30

काजोल नक्की कशी करणार घरबसल्या घसघशीत कमाई? फिक्स्ड इनकम'चा नवा फॉर्म्युला!

Kajol Leases Mumbai’s Goregaon Property To Hdfc Bank For 8.6 Crore Rent For Nine Years | काजोलला एचडीएफसी बँकेकडून दर महिन्याला मिळणार ६ लाख ९० हजार, काय आहे कारण ?

काजोलला एचडीएफसी बँकेकडून दर महिन्याला मिळणार ६ लाख ९० हजार, काय आहे कारण ?

Kajol Leases Mumbai’s Goregaon Property To Hdfc Bank : काजोल ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. काजोलने वर्षानुवर्षे चाहत्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं आहे.  अनेक सुपरहिट चित्रपटांमधील तिच्या लक्षवेधी भूमिकांनी तिला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात बहुमुखी अभिनेत्रींपैकी एक बनवलं. काजोलने लहानवयातच अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि आपल्या करिअरमध्ये अनेक प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले. आजही ती सतत चर्चेत असते. अभिनेत्री असण्यासोबतच, काजोल ही एक व्यावसायिका देखील आहे. अशातच काजोल तिच्या गुंतवणुकीच्या एका योग्य निर्णयामुळे चर्चेत आली आहे.

नुकतंच तिने मुंबईतील गोरेगावच्या 'भारत अराईस' (Bharat Arise) या इमारतीमधील तिची मालमत्ता एचडीएफसी बँकेला तब्बल नऊ वर्षांसाठी भाड्याने दिली आहे. या करारामुळे तिला महिन्याला लाखो रुपयांचे आणि नऊ वर्षांत कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.  काजोल आणि एचडीएफसी बँक यांच्यात करार १४ नोव्हेंबर २०२५ रोजी करार झाला.  या कराराची नोंदणी ५.६१ लाख स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार नोंदणी शुल्कासह करण्यात आली आहे. काजोलने ही १ हजार ८१७ चौरस फूट (sq ft) रिटेल युनिटची मालमत्ता मार्च २०२५ मध्ये २८.७८ कोटी रुपयांना खरेदी केली होती. यात पार्किंग स्लॉटचाही समावेश आहे.

९ वर्षांत ८.६ कोटींचे उत्पन्न

काजोलने बँकेकडून २७.६१ लाख रुपयांची सुरक्षा ठेव (Security Deposit) देखील घेतली आहे. विशेष म्हणजे, भाड्यामध्ये दर तीन वर्षांनी मोठी वाढ होणार आहे. ज्यामुळे काजोलची नऊ वर्षांत जबरदस्त कमाई होईल. कराराच्या पहिल्या तीन वर्षांसाठी बँक तिला दरमहा ६.९ लाख इतके भाडे देईल. यानंतर, पुढील तीन वर्षांसाठी भाड्यात १५ टक्केने वाढ होईल, ज्यामुळे मासिक भाडे ७.९ लाख होईल. तसेच, शेवटच्या तीन वर्षांसाठी पुन्हा १५ टक्के वाढीनंतर बँक तिला दरमहा ९.१३ लाख इतके भाडे देईल. अशा प्रकारे, नऊ वर्षांच्या कालावधीत काजोल भाड्यातून एकूण ८.६ कोटी रुपये कमवणार आहे. ज्यामुळे तिचा गुंतवणुकीचा हा निर्णय खूपच यशस्वी ठरला आहे.

काजोलच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर ती नुकतीच वेब सिरीज "द ट्रायल २" मध्ये दिसली होती. सध्या ती ट्विंकल खन्नासोबत टॉक शो "टू मच विथ काजोल अँड ट्विंकल" होस्ट करत आहे. लवकरच ती 'महाराग्नी: क्वीन ऑफ क्वीन्स'  या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटातही दिसणार आहे, ज्यात प्रभू देवा आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही प्रमुख भूमिका असण्याची शक्यता आहे.

Web Title: Kajol Leases Mumbai’s Goregaon Property To Hdfc Bank For 8.6 Crore Rent For Nine Years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.