काजोल म्हणते, आमिर खान माझ्या ‘क्लास’मध्ये नकोच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 15:35 IST2018-08-16T15:34:10+5:302018-08-16T15:35:01+5:30

काजोलचा ‘हेलिकॉप्टर ईला’ हा चित्रपट लवकरचं प्रदर्शित होतोय. सध्या काजोल याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

Kajol doesn’t want Aamir Khan in her class, here's why | काजोल म्हणते, आमिर खान माझ्या ‘क्लास’मध्ये नकोच!

काजोल म्हणते, आमिर खान माझ्या ‘क्लास’मध्ये नकोच!

काजोलचा ‘हेलिकॉप्टर ईला’ हा चित्रपट लवकरचं प्रदर्शित होतोय. सध्या काजोल याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडे चित्रपटाच्याच प्रमोशनसाठी काजोल ‘इंडियाज् बेस्ट ड्रामेबाज’च्या सेटवर पोहोचली. या सेटवर काजोलने धम्माल मस्ती केली. तितक्याच मनमोकळ्या गप्पा केला. तुला पुन्हा एकदा कॉलेजात जायची संधी मिळाली तर तुला कोण कोण तुझे क्लासमेट म्हणून आवडतील? असा प्रश्न याठिकाणी काजोलला केला गेला. यावर काजोलने कुणाकुणाचे नाव घेतले असेल, काही अंदाज? काजोलने पहिले नाव घेतले ते तिचा पती अजय देवगणचे आणि दुसरे नाव होते अर्थातचं शाहरूख खानचे. अजय व शाहरूख हे दोघेही मला माझे क्लासमेट म्हणून आवडतील. कारण हे दोघेही माझ्यासारखेच ‘बॅकबेंचर्स’ (मागच्या बाकावर बसून टवाळक्या करणारे) आहेत, असे काजोल म्हणाली.   कोण तुला तुझे क्लासमेट म्हणून नको असेल? असा आणखी एक प्रश्न काजोलला विचारला गेला. यावर काजोलने कुणाचे नाव घेतले माहितीये? तर आमिर खानचे. होय, आमिर मला माझा क्लासमेट म्हणून नको आहे, असे काजोल म्हणाली. का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. काजोलने यावर अतिशय मजेशीर उत्तर दिले. आमिरला हा नक्कीच टीचरचा आवडला असणार आणि आम्ही खोड्या केल्या की, तो टीचरकडे तक्रार करणार, म्हणून मला तो माझा क्लासमेट म्हणून नको, असे काजोल म्हणाली. केवळ इतकेच नाही तर यावर स्वत:च खो-खो हसत सुटली.

Web Title: Kajol doesn’t want Aamir Khan in her class, here's why

टॅग्स :Kajolकाजोल