काजोलने सैफ अली खानवर केला हा धक्कादायक आरोप, वाचा काय घडलं नेमकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 13:40 IST2019-12-30T13:40:35+5:302019-12-30T13:40:46+5:30

काजोलचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतेय. लोकांनी त्यांच्या या ट्वीटला रिट्वीट करुन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.   

kajol accuses on saif ali khan and says you betrayed me in omkara | काजोलने सैफ अली खानवर केला हा धक्कादायक आरोप, वाचा काय घडलं नेमकं

काजोलने सैफ अली खानवर केला हा धक्कादायक आरोप, वाचा काय घडलं नेमकं

बॉलिवूड अभिनेत्री काजोलचे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. काजोलने या ट्वीटमध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर धोका दिल्याचा आरोप केला आहे. या फोटोत सैफसोबत अजय देवगणसुद्धा दिसतो आहे या फोटो काजलने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. 


काजोलने ट्वीटवर फोटो शेअर करत लिहिले आहे की, ''तुम्ही मला आणि ओमकाला धोका दिला आणि आता प्रमोशनच्या दरम्यानसुद्धा तेच केले.''  काजोल पुढे लिहिते, आशा आहे की सैफ अली खान हे स्वित्झर्लंडमध्ये वाचत असले. काजोलचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतेय. लोकांनी त्यांच्या या ट्वीटला रिट्वीट करुन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.   




अजय देवगणचा आगामी सिनेमा 'तानाजी: द अनसंग वॉरियर' 10 जानेवारीला रिलीज होणार आहे. अजय देवगणची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमात अजयची पत्नी काजोल महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 




सध्या सगळे स्टार्स सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी सैफ अली खान आणि अजय देवगण एकटेच स्वित्झर्लंड गेले आहेत. त्यामुळे काजोल नाराज झाली आहे. काजोलने ट्वीटच्या माध्यमातून दोघांवर आपली नाराजी व्यक्त करत धोका दिल्याचा आरोप लावला आहे. 

Web Title: kajol accuses on saif ali khan and says you betrayed me in omkara